धूम स्टाईलने मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:53 PM2019-09-16T23:53:10+5:302019-09-16T23:53:45+5:30

जळगाव - कार्यालयीन कामकाज संपवून शिवतीर्थ मैदानाजवळून पायी जात असलेल्या लोकेश वना गगणे (रा़ महाबळ परिसर) या तरूणाच्या हातातून ...

Arrested by Dhoom Style for extending mobile | धूम स्टाईलने मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना अटक

धूम स्टाईलने मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना अटक

Next

जळगाव- कार्यालयीन कामकाज संपवून शिवतीर्थ मैदानाजवळून पायी जात असलेल्या लोकेश वना गगणे (रा़ महाबळ परिसर) या तरूणाच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धूम स्टाईलने महागडा मोबाईल चोरून नेला होता़ याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला संशयितांना पकडण्यात यश आले असून भूषण विजय माळी (१९) व आकाश सुकलाल ठाकूर (१९, दोन्ही रा़ तुकारामवाडी) असे संशयितांची नावे आहेत़ एक संशयित मात्र फरार आहे़
महाबळ कॉलनी परिसरातील रहिवासी लोकेश गगणे हा २७ आॅगस्ट रोजी चाळीसगाव येथे गेला होता़ रात्री कार्यालयीन कामकाज आटोपून जळगावात परतल्यानंतर शिवतीर्थ मैदानाजवळून घरी पायी जात असताना रात्री १०़३० वाजेच्या सुमास मागून दुचाकीवरून ट्रीपल सीट आलेल्या तिघांपैकी मागे बसलेल्याने लोकेश याच्या हातातून मोबाईल हिसकावला व तिघांनी तेथून धूम ठोकली़ त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मोबाईल चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला़

दोघांना केली अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या पथकाडून चोरट्यांचा शोध सुरू होता़ अखेर स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या पथकाला मोबाईल चोरटे हे तुकारामवाडी येथील असल्याची माहिती मिळाली़ तर भूषण माळी, आकाश ठाकूर व विशाल कोळी या तिघांनी ही चोरी केल्याचेही निष्पन्न झाले़ अखेर स्थानिक गुन्हे पथकाने शनिवारी भूषण कोळी व आकाश ठाकूर या दोघांना तुकारामवाडी येथून अटक केली़ तिसरा साथीदार पसार आहे़

यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा पथकातील रवींद्र पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख, सुधाकर अंभोंरे, अनिल जाधव, अश्रफ शेख, दादा पाटील, दीपक पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारूळे यांनी चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई केली आहे़

Web Title: Arrested by Dhoom Style for extending mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.