पारोळा दरोड्यातील आरोपीस १४ वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:05 PM2018-10-06T23:05:22+5:302018-10-06T23:06:17+5:30

१४ वर्षांपूर्वी घराचा कडी-कोंडा तोडून टॉमीने मारहाण करून सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्या प्रकरणातील फरार आरोपीस पोलिसांनी १४ वर्षांनंतर जेरबंद केले.

Arrested in Parola Dock 14 years after arrest | पारोळा दरोड्यातील आरोपीस १४ वर्षांनी अटक

पारोळा दरोड्यातील आरोपीस १४ वर्षांनी अटक

Next
ठळक मुद्दे पोलिसांनी आरोपीला पकडले औरंगाबाद येथेपारोळा पोलिसांच्या पथकाने आरोपीस केले जेरबंद


पारोळा, जि.जळगाव : विद्यानगरात १४ वर्षांपूर्वी घराचा कडी-कोंडा तोडून टॉमीने मारहाण करून सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्या प्रकरणातील फरार आरोपीस पोलिसांनी १४ वर्षांनंतर जेरबंद केले.
विठ्ठल राजाराम पाटील यांच्या घरात ११ सप्टेंबर २००४ रोजी ४ ते ५ जणांनी घराच्या दरवाजाचा कडी- कोयंडा तोडून घरात प्रवेश केल्यावर घरातील कुटुंबाने आरडा ओरड करू नये म्हणून त्यांना लोखंडी टॉमीने डोक्यावर, हातापायास गंभीर मारहाण केली होती. जखमींच्या अंगावरील सोने व कपाटातील सोन्याचे दागिने सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीचे चोरून नेले होते. यातील काही आरोपी निष्पन्न झाले. त्यांना अटक व शिक्षा झाली. परंतु या सशस्त्र दरोड्यातील मुख्य सूत्रधार व अट्टल गुन्हेगार सचिन ठगसेन काळे (३२) रा.वाळुंज, ता.गंगापूर जि.औरंगाबाद हा १४ वर्षांपासून पोलिसांना चकमा देत असताना शुक्रवारी पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांना काळे हा अट्टल औरंगाबाद येथे आलेला असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी जयवंत पाटील, ईश्वर शिंदे, आबा पाटील, राहुल चौधरी यांना औरंगाबाद येथे पाठवविले. सचिन ठगसेन काळे यास पोलिसांनी पाठलाग करून रात्री १० वाजता ताब्यात घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.


 

Web Title: Arrested in Parola Dock 14 years after arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.