उघड्या घरातून रोकड व मोबाईल लांबविणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:17+5:302021-08-29T04:18:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एमआयडीसीतील फातेमा नगरात इम्रान शरीफ खान (वय ३६) यांच्या उघड्या घरातून मध्यरात्री साडेआठ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एमआयडीसीतील फातेमा नगरात इम्रान शरीफ खान (वय ३६) यांच्या उघड्या घरातून मध्यरात्री साडेआठ हजार रुपये रोख व दोन मोबाईल लांबविणाऱ्या शेख मोसीन ऊर्फ दत्ता शेख हमीद (वय २८,रा.मास्टर कॉलनी, जळगाव मूळ रा.अडावद, ता.चोपडा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मास्टर कॉलनीतून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल व दोन हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे २०२१ रोजी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने इम्रान खान यांनी घराचा दरवाजा उघडा केला होता. त्यानंतर कुटुंब झोपून गेले. पहाटेच्या सुमारास घरातील दोन्ही मोबाईल व कपाटातील रोकड गायब झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, ही चोरी शेख मोसीन व हमीदखान अय्युब खान (रा.गणेशपुरी) या दोघांनी केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील व राजेंद्र सोनार यांनी दोघांचा शोध घेतला असता शुक्रवारी शेख मोसीन हा मिळून आला तर त्याचा साथीदार अजून मिळून आलेला नाही. अटकेतील संशयिताला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.