जळगाव जिल्ह्यात श्रींचे मंगलमय आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:27 PM2018-09-13T22:27:41+5:302018-09-13T22:29:21+5:30
बुद्धी आणि शक्तीची देवता असलेल्या गणरायाचे गुरुवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे शिस्तबद्ध लेझीम नृत्य करण्यात आले. सकाळी अनेकांनी गणेशाच्या मूतीची खरेदी करीत विधीवत स्थापना केली.
जळगाव : बुद्धी आणि शक्तीची देवता असलेल्या गणरायाचे गुरुवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे शिस्तबद्ध लेझीम नृत्य करण्यात आले. सकाळी अनेकांनी गणेशाच्या मूतीची खरेदी करीत विधीवत स्थापना केली.
भुसावळ विभागातील भुसावळ, रावेर, यावल,बोदवड आणि मुक्ताईनगर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने श्री गणरायाची स्थापना करण्यात आली.
जामनेरातील मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संदेश!
सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सवाद्य मिरवणुकीने गणेशाची स्थापना केली. शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, लॉर्ड गणेशा स्कूलच्या मिरवणुकीत लेझीम खेळणाऱ्या व पारंपारिक वेशभूषा केलेल्या व पर्यावरण संदेश देणाºया विद्यार्थिनींनी लक्ष वेधून घेतले होते.
एरंडोल येथे श्रींची स्थापना
एरंडोल येथे २० सार्वजनिक मंडळांनी व २० खाजगी मंडळांनी जल्लोषात स्थापना केली. एरंडोल पोलीस स्टेशनला ३० मंडळांनी नोंदणी केली आहे. काही मंडळांनी मिरवणूक न काढता श्रींची स्थापना केली.
धरणगाव तालुक्यात ८३ मंडळांनी केली श्रींची स्थापना
धरणगाव शहरासह तालुक्यात एकूण ८३ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीं ची स्थापना केली. त्यात शहरी ३१ व ग्रामीण ५२ गणेश मंडळांचा सहभाग आहे. शहरातील शतकमहोत्सवी पी.आर.हायस्कूल व बालकवी-सारजाई कुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी ७.३० वा. भव्य लेझीम व ढोल पथकांसह काढलेल्या मिरवणूकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले.