आर्ट गॅलरीमुळे कलावंताना मिळाले हक्काचे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:43 PM2020-01-01T12:43:30+5:302020-01-01T12:44:07+5:30

जळगावसह नाशिक, मुंबईतील कलावंतांचा सहभाग अणि उज्ज्वल भवितव्याची वाटही सुकर

Art Gallery gains a platform for artists | आर्ट गॅलरीमुळे कलावंताना मिळाले हक्काचे व्यासपीठ

आर्ट गॅलरीमुळे कलावंताना मिळाले हक्काचे व्यासपीठ

Next

सचिन देव  
जळगाव : कला ही नेहमी जिवंत असते. मात्र, ही कला समाजापर्यंत पोहचण्यासाठी कलाकाराला व्यासपीठ मिळणे गरजेचं आहे, तरंच ही कला व्यापक पद्धतीने समृद्ध होत असते. जळगावातील अशाच नवोदित कलाकारांना गेल्या दीड वर्षांपासून पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरीने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असून, आतापर्यंत स्थानिक कलावंतांसह नाशिक व मुंबईतील कलाकारानींही जळगावला येऊन चित्रांचे प्रदर्शंन भरविले आहे.
कलावतांसाठी ३ मार्च २०१८ ला ही आर्ट गॅलरी उपलब्ध करुन देण्यात आली. विशेष म्हणजे प्रदर्शनासाठी कुठल्या प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सर्व सुविधा मोफत दिल्या जात आहेत. या आर्ट गॅलरीचं वैशिष्टये म्हणजे चित्रकृती व शिल्पकृती मांडण्यासाठी प्रशस्त दालन आणि कलाकृती उठावदार दिसतील.
अशा पद्धतीची या ठिकाणी प्रकाश योजना करण्यात आली आहे. भितींना चित्रांच्या प्रतिकृती लावल्यानंतर एक प्रकारे निसर्गाचा सहवासचं प्रेक्षकांना घडतो, असे वातावरण असते. दरम्यान, जळगावातील कलावतांना प्रथमच प्रशस्त अशी आर्ट गॅलरीचे व्यासपीठ मिळाल्यामुळे, अनेक कलावतांनी येथील अभिप्राय डायरीमध्ये आपले मनोगत व्यक्त करुन, या चित्र प्रदर्शनातून उज्जवल भवितव्याची वाट निर्माण होणार असल्याचे नमूद केले आहे.
मार्च २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ४३ जणांनी या ठिकाणी प्रदर्शन भरविले आहे. एका कलावंताला १५ दिवस प्रदर्शन भरविण्याची संधी दिली जाते. गॅलरीतर्फे उद्घाटनाचे सर्व साहित्यही मोफत पुरविले जाते, मदतीसाठी कर्मचारी दिला जातो. कलावतांकडून प्रदर्शनासाठी गॅलरीचे बुकींग करतेवेळी फक्त नाव, पत्ता व दुरध्वनी घेतला जातो. विशेष म्हणजे नव्या वर्षांतील बहुतांश महिन्यांच्या तारखाही आतापासून आरक्षित झाल्या आहेत.
आर्ट गॅलरीत आतापर्यंत निसर्ग चित्र, कॅलिग्रॉफी, पेन्टींग, मॉडर्न आर्ट, भारतीय अलंकारिक शैली चित्र, लॅन्टन डिझाईन, लॅण्ड स्केप, व्यक्ती चित्र, शिल्प चित्र, कोलाज, कॅनव्हान्स न्युरल पेपरवरील चित्रे, रेखाटन चित्रे, पेन्सील स्लायडींग चित्रे, सुलेखन कला यासह विविध प्रकारच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी तर जळगावकरांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते.

Web Title: Art Gallery gains a platform for artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव