कलाशिक्षकाने चित्राद्वारे साकारले देवरुपी पांडव योद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:49 PM2020-06-27T17:49:04+5:302020-06-27T17:50:04+5:30

आजच्या परिस्थितीत देवरूपी डॉक्टर, नर्स, पोलीस, वीज कर्मचारी, सफाई कर्मचारी हे सर्व महाभारतातील ‘पांडव योद्ध्या’प्रमाणे लढा देत आहेत.

The art teacher portrayed the Pandava warrior in the form of a god | कलाशिक्षकाने चित्राद्वारे साकारले देवरुपी पांडव योद्धा

कलाशिक्षकाने चित्राद्वारे साकारले देवरुपी पांडव योद्धा

googlenewsNext
ठळक मुद्देकलाशिक्षक राजू साळी यांची कलाकुसरी३४ बाय २४ इंच आकारात पेंटींग

चांगदेव, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : सर्व जगात कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. तरी पण प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून एकेकाळी महाभारतातील पाच पांडवांनी असंख्य कौरवांना हरवून ठार केले व विजय मिळवला होता. आजच्या परिस्थितीत देवरूपी डॉक्टर, नर्स, पोलीस, वीज कर्मचारी, सफाई कर्मचारी हे सर्व महाभारतातील ‘पांडव योद्ध्या’प्रमाणे लढा देत आहेत. स्वत:चा जीव मुठीत धरून अहोरात्र अनेकांंचे प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. काही योद्ध्यांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले. या देवरूपी पांडवांचा एकच उद्देश कोरोनाचा नायनाट करणे, त्यास हरविणे अशी पांडवांची संकल्पना चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेने कुंचल्याद्वारे पोस्टर कलर माध्यमातून साकारली आहे.
३४ बाय २४ इंच आकारात पेंटींग तयार करण्यात आली. या पेंटींगमध्ये ‘डॉक्टर, नर्स, पोलीस वीज कर्मचारी, सफाई कर्मचारी यही महाभारत के पांडव योद्धा कोरोना को हरायेगे और भारत को जितायेगे’ या घोषवाक्याद्वारे आकाशातून पांडव पृथ्वीवर कोरोनाला हरविण्यासाठी येत आहेत. पांडवांच्या हातात शस्त्रे दाखवण्यात आली आहे. विशेषत: भारताचा झेंडा विजयी होऊन आकाशात दाखवला आहे. पेंटींगमध्ये वातावरण निर्मितीचा भास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: The art teacher portrayed the Pandava warrior in the form of a god

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.