आर्टिकल- कचरा वेचक, बालमजूर, आर्थिक दुर्बल घटकातील मुले आणि कोरोना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:11+5:302020-12-15T04:32:11+5:30
ऑक्टोबरमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार केरळ राज्यात लॉकडाऊनपासून सुमारे १७३ मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील बहुतांश आत्महत्या या कुटुंबाकडे शिक्षण ...
ऑक्टोबरमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार केरळ राज्यात लॉकडाऊनपासून सुमारे १७३ मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील बहुतांश आत्महत्या या कुटुंबाकडे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी संसाधने नाहीत म्हणून झाल्या आहेत. बऱ्याच मुलांनी कुटुंबाला मदत करण्यासाठी कचरा वेचणे, गल्लोगल्ली फिरून खायला मागणे तसेच इतर ठिकाणी काम करणे सुरू केले आहे. पुढील काळात सगळ्या इयत्तेच्या शाळा सुरू झाल्यानंतर या मुलांना पुन्हा एकदा शिक्षणप्रक्रियेत आणण्यासाठी काम करण्याची गरज लागणार आहे.
बहुतांश शहरांमधून मजूर आपापल्या कुटुंबांसोबत गावी परतले आहेत. यातले काही मजुरांनी कामाच्या ठिकाणी परत येण्यास सुरुवात जरी केलेली असली तरी कोरोनाच्या भीतीने त्यांनी त्यांचे इतर कुटुंब गावाकडेच ठेवली आहेत. ही मुले शिक्षणप्रक्रियेशी पूर्णपणे तुटली आहेत. या मुलांचा शोध घेत त्यांचे शिक्षण थांबणार नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे आहे. शालेय समिती आणि स्थानिक संस्था एकत्रितपणे हे काम करू शकतात.
आर्थिक-दुर्बल घटकातील मुलांवर कोरोनाचे होणारे परिणाम, प्रश्न किंवा चर्चा या केवळ शालेय शिक्षण
आणि त्याला पर्याय वाटणारे इ-लर्निंग याभोवतीच फिरताना दिसत आहेत. मात्र हे प्रश्न एवढ्यानेच संपणारे
नाहीत. स्वच्छता, आरोग्य, व्यसने, वाढती बालमजुरी, बालविवाह, बाललैंगिक अत्याचार असे त्याचे व्यापक
स्वरूप आहे. येणाऱ्या काळात आपल्याला या सगळ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळेच वस्ती-पातळीवर
संस्थांनी उपाययोजना करण्याची गरज पूर्वीपेक्षा वाढलेली आहे.
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात आपल्याला मिळतीलच ! काही प्रश्नांची उत्तरे
आपल्याला एकत्र येऊन शोधावी लागणार आहेत. एक मात्र खरे, की इथून पुढे काहीच पूर्वीसारखे नसणारे!
एकमेकांशी वागण्याचे, भेटण्याचे, देवाण-घेवाणीचे सगळे संदर्भ बदलणार आहेत. खरे तर कोरोनाने आपल्याला
एक संधी दिली आहे बदलण्याची. आपण ज्या सामाजिक संरचनेमध्ये जगतो, त्याची पुनर्मांडणी करण्याची,
पुनर्रचना करण्याची ! संसाधनाचे समान आणि निहाय वाटप करण्याची.
- अद्वैत दंडवते, संचालक, सहसंस्थापक तथा कार्यकारी संचालक, वर्धिष्णू सोसायटी