पावसानंतर पिकांवर राखेसारखा थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:16 AM2021-07-25T04:16:27+5:302021-07-25T04:16:27+5:30
जळगाव : जिल्ह्याच्या काही भागांत २३ रोजी तुरळक पाऊस पडला. यामुळे पिकांवर राखेसारखा थर जमले आहेत. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या ...
जळगाव : जिल्ह्याच्या काही भागांत २३ रोजी तुरळक पाऊस पडला. यामुळे पिकांवर राखेसारखा थर जमले आहेत. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
जिल्ह्यात अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. २३ रोजी पावसाने काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. मात्र, या पावसानंतर हिरव्या पिकांवर राखेसारखा थर दिसू लागले. घरांच्या ओट्यावरदेखील पांढरट पावडर दिसत होती. अमळनेर येथील तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांशी संपर्क साधून पिकांवरील पांढऱ्या डागाचे फोटो पाठवले. त्यावर तज्ज्ञांनी हे डाग हवेतील धूळ आणि क्षार यांच्या मिश्रणाने ते डाग पडले आहेत. त्यामुळे दुष्परिणाम होणार नाही, असे सांगितले.
प्रतिक्रिया
कपाशी पिकासह वांगे, मिरची, कारले, भाजीपाला लागवड केली आहे. शुक्रवारी दुपारी शेतात गेल्यावर पानांवर पांढरे ठिपके निदर्शनास आले. या प्रादुर्भावाने चिंता वाढली आहे.
-अजय कडुबा चौधरी, शेतकरी जामनेर
प्रतिक्रिया
यासंदर्भात कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली. त्यांच्या मतानुसार सोडियमयुक्त पाऊस झाला आहे. कीड, रोग किंवा कोणताही प्रादुर्भाव नाही. उत्पादनावर काही परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता स्वच्छ पाण्याची फवारणी करावी किंवा जोरदार पावसाने पांढरे डाग स्वच्छ होतील.
-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेर