आशा कर्मचाऱ्यांना मानधन वाढ अदा करा- आयटकची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 16:34 IST2020-11-15T16:34:14+5:302020-11-15T16:34:36+5:30
आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना जुलैपासून मानधनवाढीचा फरक दिवाळीपूर्वी देण्याचे सरकारने जाहीर केले होते. आता शासनाने वाढीव मानधनासह फरक अदा करावी

आशा कर्मचाऱ्यांना मानधन वाढ अदा करा- आयटकची मागणी
यावल : आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना जुलैपासून मानधनवाढीचा फरक दिवाळीपूर्वी देण्याचे सरकारने जाहीर केले होते. आता शासनाने वाढीव मानधनासह फरक अदा करावी व केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांसाठी सायकल तरतूद केलेली असल्याने त्यासंदर्भात पाठपुरावा करावा अशा आशयाचे निवेदन आयटकच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत ब-हाटे यांना देण्यात आले.
शासनाने आशावर्कर्सना मोबाईल देण्याचे परिपत्रक काढले. शासनाने त्याची अंमलबजावणी करावी. गणवेशापोटी वार्षिक १२०० रुपये द्यावेत, भाऊबीजेसाठी किमान दोन हजार रुपये रक्कम द्यावी आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. हे निवदेन आयटकतर्फे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन, उपाध्यक्षा मनीषा बैरागी, सचिव सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे यांनी दिले आहे.