आशा स्वयंसेविका कृती समितीचा आजपासून संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:24+5:302021-06-16T04:21:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नागरी व ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना कोरोना संबंधित कामाबद्दल प्रतिदिन ३०० रुपये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नागरी व ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना कोरोना संबंधित कामाबद्दल प्रतिदिन ३०० रुपये भत्ता मिळावा, वाढीव मानधन मिळावे यासाठी मागणीसाठी कृती समितीने १५ जूनपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. त्यांनी याबाबत शासनाला निवेदन दिले.
आशा स्वयंसेविकांचे मानधन १८ हजार तर गटप्रवर्तकांचे मानधन हे २२ हजार करावे, आशा स्वयंसेविकांना कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, आशा व गटप्रवर्तक कोरोनाचे काम करत आहेत. त्याचा मोबदला शासनाने ठरविला नसून मार्च २०२१ पासून कोरोना कामाचा मोबदला त्यांना देण्यात आलेला नाही. तो मोबदला मिळावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून निवेदन देताना शारदा कुटे, बबिता बाविस्कर, छाया बिरारी, यास्मीन पटेल, प्रतिभा पगारे, रत्ना मोरे, योगिता कोळी, कविता वाणी, कॉ. विजय पवार व कॉ. प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.