आशा स्वयंसेविकांचे १७ पासून धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:25+5:302020-12-16T04:32:25+5:30
जुलै २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत मानधनवाढीचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे. मात्र, तो अद्याप अदा करण्यात ...
जुलै २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत मानधनवाढीचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे. मात्र, तो अद्याप अदा करण्यात आलेला नाही परिणामी आशा स्वयंसेविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही मानधनवाढीची रक्कम त्वरित अदा करावी, अभियानाचा ठरलेला भत्ता तातडीने अदा करावा, गणवेशाची रक्कम मिळावी, आशासेविकांना धमकी देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सर्वेक्षणाचा मोबदला मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदसमोर सकाळी ११ वाजता सर्व आशासेविका आणि गटप्रवर्तकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कल्पना भोई, भगिरथी पाटील, भारती नेमाडे, सुनंदा पाटील, सुनीता भोसले, भारती तायडे, माया बोरसे, भारती चौधरी, अनिता कोल्हे, उषा मोरे, करुणा कुमावत, संगीता पाटील, उषा महाजन, सुनीता विनंते आदींनी केले आहे.