गावी परतणाऱ्यांची आशा वर्कर, अंगणवाडी सेविका देणार माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:37 PM2020-03-22T12:37:31+5:302020-03-22T12:38:15+5:30
‘कोरोना’विषयी उपाययोजना
जळगाव : जळगाव जिल्ह्यात मुंबई, पुणे व अन्य शहरातून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही गावात बाहेर गावाहून आलेल्या व काही लक्षणे आढळल्यास त्यांची माहिती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्याचा निर्णaय शनिवारी झालेल्या कोरोना विषयक दैनंदिन आढावा बैठकीत घेण्यात आला. तशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
त्या वेळी ‘कोरोना’विषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासह येणाºया काळात काय उपाययोजना करावयाच्या आहे, या विषयी चर्चा करण्यात आली. या वेळी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सदस्य सचिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, सदस्य जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण आदी उपस्थित होते.
पुण्याकडून येणाºयांची संख्या अधिक
सध्या पुणे येथून जिल्ह्यात येणाºयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे गावी परतणाºया सर्व जणांनी तसेच जिल्हावासीयांनीही काळजी घेणे गरजेचे असल्याने त्यासाठी या बाहेर गावाहून परणाºयांची माहिती ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी बैठकीत सांगितले. यासाठी गावा-गावात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
१६ जणांची तपासणी, सर्व निगेटिव्ह
शनिवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतील आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील १६ कोरोना संशयितांची तपासणी करण्यात आली. या सर्व १६ जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या संशयित म्हणून केवळ दोन जण दाखल असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.
जिल्हाभर सज्जता
सुदैवाने जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नसून भविष्यात गंभीर परिस्थिती उद््भवल्यास प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात कक्ष उभारणीसह जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था करण्यात येईल, असे नियोजन असून प्रसंगी खाजगी रुग्णालय, वसतिगृह यांचाही उपयोग करून घेतलाजाईलअशीमाहितीजिल्हाधिकाºयांनीदिली.
व्हेंटीलेटरही पुरेसे
रुग्णांची संख्या वाढली व त्यांच्यासाठी आवश्यक साधनांचीही व्यवस्था करण्यात आली असून रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची गरज भासल्यास त्यांचीही पुरेसी व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी बैठकीनंतर सांगितले.
खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल करू नका
समितीची बैठक सुरू असताना जिल्हाधिकाºयांनी आयएमए व निमा या डॉक्टरांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांना तातडीने बोलावून घेतले. त्या वेळी त्यांच्याकडून खाजगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या साधन-सामग्रीची माहिती घेतली. या सोबतच गरज नसताना कोणताही रुग्ण संशयित म्हणून शासकीय रुग्णालयात पाठवू नये व यंत्रणेवर ताण वाढवू नका, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी डॉक्टरांना दिल्या. जेवढे रुग्ण वाढले तेवढे प्रयोग शाळेवरही ताण येत असल्याने खाजगी डॉक्टरांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र कोरोनाची लक्षणे असणारा रुग्णही खाजगी रुग्णालयात ठेवून इतर रुग्णांना बाधा होणार नाही, यासाठी असे रुग्ण खाजगी रुग्णालयात ठेवू नका, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या. या वेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील, उपाध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, माजी सचिव डॉ. राजेश पाटील, निमाचे डॉ. राजेश पाटील उपस्थित होते.
खाजगी डॉक्टर देणार सेवा
खाजगी रुग्णालयात उपलब्ध व्हेंटिलिटरची माहिती जिल्हाधिकाºयांनी मागितली असून त्याची यादी आयएमए त्यांना देणार आहे. या सोबतच शासकीय रुग्णालयात मनुष्यबळ कमी पडल्यास खाजगी डॉक्टरही तेथे सेवा देण्याची तयारी आयएमए व ‘निमा’ने दाखविली आहे.