सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक कोतवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:24+5:302020-12-15T04:32:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय ...

Ashok Kotwal as the President of Suryoday Marathi Sahitya Sammelan | सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक कोतवाल

सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक कोतवाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन येत्या मार्च महिन्यात कवी अशोक कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनाचे उद्घाटन कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तर कवी प्रा. बी. एन. चौधरी हे संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्षपद भूषवणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी कळविलेले आहे.

२० जानेवारीपर्यंत पाठवू शकतात कविता

संमेलनात ‘शब्द झंकार’ सत्राअंतर्गत कविसंमेलन होणार असून, संमेलनात कविता वाचन करू इच्छित कवींनी दोन कविता पाठवाव्या लागणार आहे. त्यातून एक कविता कविसंमेलनासाठी निवडण्यात येणार आहे. सहभाग सर्वांसाठी खुला असून, कुठल्याही प्रकारचे प्रवेशशुल्क नसणार आहे. तसेच कवितेसाठी विषयाचे बंधन नाही. तरी कवींनी आपल्या दोन कविता २० जानेवारीपर्यंत सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे सचिव डी. बी. महाजन यांच्या प्लाट नं ८९/१, गीताई ,गोविंदपुरा, संभाजीनगर, जळगाव या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन, उपाध्यक्ष प्रवीण लोहार, सल्लागार साहेबराव पाटील यांच्यासह खान्देशातील जिल्हा व तालुकाध्यक्षांनी केलेले आहे.

Web Title: Ashok Kotwal as the President of Suryoday Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.