आश्रमशाळा भरणार ११ ते ५ या वेळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 03:01 PM2019-08-30T15:01:53+5:302019-08-30T15:01:59+5:30

संघटनेची मागणी मान्य : आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले निवेदन

The Ashram school will be filled from 2 to 3 pm | आश्रमशाळा भरणार ११ ते ५ या वेळेत

आश्रमशाळा भरणार ११ ते ५ या वेळेत

Next


चाळीसगाव : आदिवासी विभागांर्तगत येणाºया आश्रमशाळांची वेळ यापुढे ११ ते ५ करण्यात आली असून याबाबत कर्मचारी संघटनेने गुरुवारी यावल प्रकल्प आधिका-यांना निवेदन दिले होते. मागणी मान्य झाल्याने कर्मचा-यांनी आनंद व्यक्त केला असून प्रकल्प अधिकारी वनिता सोनवणे यांनी तसे पत्र निर्गमित केले आहे.
यावल आदिवासी विकास विभाग कार्यालयार्गत येणाºया कर्मचारी संघटनेतर्फे गुरुवारी यावल येथे प्रकल्प अधिकारी वनिता सोनवणे यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
आश्रमशाळांची वेळ ११ ते ५ करण्यासह सातव्या वेतन आयोगच्या वेतन निश्चिती तील त्रुटी दुर कराव्या, कर्मचाऱ्यांचे स्थायी आदेश मिळावे. अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतांना संघटनेचे चाळीसगाव तालुक्यातील पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी मागण्यांविषती प्रकल्प अधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शाळेच्या वेळे संदर्भात प्रकल्प अधिकारी यांनी दखल घेऊन तात्काळ पत्र दिले. इतर मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करु. असे आश्वासन सोनवणे यांनी दिले. संघटनेच्या विभागीय महिला उपाध्यक्षा अलका सरदार (चाळीसगाव), प्रकल्प अध्यक्ष पी.बी. बोदवडे, प्रकल्प कार्याध्यक्ष गवारे सर, सचिव डी.बी. पाटील, खजिनदार के. ए. महाजन संघटक विशाल राठोड, सल्लागार अविनाश शिवरामे, भारत नान्दरे, विजया चौधरी, अरुण महाजन, राजेंद्र बोदडे, हरी चौहान, भागवत कुमावत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The Ashram school will be filled from 2 to 3 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.