बुद्धांचा अष्टांग मार्ग म्हणजेच जीवन विद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 05:09 PM2018-08-22T17:09:16+5:302018-08-22T17:23:33+5:30
अमळनेर येथे बी.एस.पाटील यांचे व्याख्यान
अमळनेर, जि.जळगाव : मनुष्य जन्म रडत कुढत न जगता, निसर्ग नियमाच्या अनुकरणाने जगा. त्यामुळे जीवनामध्ये दु:खाचा शिरकाव कमी होतो आणि आपण आनंदान,े समाधानाने जीवन जगू शकतो, असे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी ‘जीवन जगण्याची कला’ या विषयावर बोलताना सांगितले.
येथील रोटरी हॉलच्या पटांगणात डॉ.पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी डॉ. पाटील यांनी सांगितले की, सुख-दु:खाच्या कल्पना सापेक्ष असतात. प्रत्येक दु:खात सुखाची बिजे असतात तर प्रत्येक सुखात दु:खाची बिजे असतात. जीवनाचा प्रवाह रेल्वे पट्ट्याप्रमाणे सरळ रेषेत कधीच नसतो तर नदीप्रमाणे वेडा वाकडा असतो.
भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्गाचे अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. या वेळी पी व्ही.पाटील, बजरंग अग्रवाल, हरी भिका वाणी, श्याम लुल्ला, जयवंतराव पाटील यांच्यासह श्रोते उपस्थित होते.