भुसावळात कुढापा मंडळाचा अष्टविनायकाचा देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 07:57 PM2018-09-16T19:57:27+5:302018-09-16T19:58:18+5:30
भुसावळ, जि.जळगाव : येथील कुढापा गणेश मंडळाने यंदा अष्टविनायकाचा देखावा तयार केला आहे.
गेल्या १० वर्षांपासूनची सजीव देखाव्यांची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. गेल्या १० वर्षात एड्सविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती, लोडशेडिंग, शेतकरी आत्महत्या, साक्षरता, महिला सबलीकरण अशा विषयांवर कुढापा गणेश मंडळ यांनी नेहमी सजीव देखावे सादर केलेले आहे व जनतेमध्ये जागृती निर्माण केलेली आहे
यावर्षी आध्यात्मावर आधारित ‘अष्टविनायक दर्शन’चा सजीव देखावा सादर केला आहे. या देखाव्यात साधूच्या भूमिकेत यश वाघुळदे व गणेश भक्ताच्या भूमिकेत प्रथमेष धांडे हे सहभागी होतील.
याआधी या देखाव्याचे उद्घाटन आमदार संजय सावकारे तसेच नगराध्यक्ष रमण भोळे, प्रासुनील नेवे, मनोज बियाणी, युवराज लोणारी, किरण कोलते यांच्यासह मान्यवराच्या हस्ते १७ रोजी संध्याकाळी होणार आहे.
सर्व गणेशभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक धांडे यांनी केलेले आहे. देखावा यशस्वी होण्यासाठी सागर वाघोदे, नरेंद्र लोखंडे, किरण बढे, सागर लोखंडे, नितीन पाटील, रुपेश पाटील, घमा फेगडे, अनुप लोखंडे, कुंदन लोखंडे, पराग वाघोदे, सचिन पाटील, गणेश लोखंडे, सतीश धांडे, राकेश तुषार बºहाटे, प्रशांत धांडे, मुकेश महाले तसेच कुढापा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.