महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉन स्पर्धेत अश्विनी मोरे चा संघ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:05+5:302021-05-07T04:17:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या राज्य इनोव्हेशन सोसायटीने, महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाच्यानिमित्ताने २३ ते २५ एप्रिल या कालावधीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या राज्य इनोव्हेशन सोसायटीने, महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाच्यानिमित्ताने २३ ते २५ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉन ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यात समाजास व वैद्यकीय क्षेत्रास परवडण्यायोग्य रोग निदानासाठीची साधने या ट्रॅकमध्ये अश्विनी मोरे या एसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या संघात अश्विनी मोरेसह आयआयटी बॉम्बे, वैद्यकीय महाविद्यालय सायन, औषध निर्माण महाविद्यालय पुणे, औषध निर्माण महाविद्यालय नागपूर या संस्थामधील सात सदस्य होते. या संघाने आयसीटी बेस स्क्रिनिंग टूल टू रॅपिड टेस्ट फॉर सर्व्हायलन्स ॲण्ड डॊयोग्नोस्टिकस ऑफ ड्रग सेन्सिटिव्हिटी ॲण्ड ड्रग रेसिस्टन्स टीबी या टूलची संकल्पना मांडली. यात त्यांनी पेशंटला मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये न जाता टीबीचे निदान करता येण्यासाठी प्रेग्नेंसी टेस्ट किट सारखीच टीबी टेस्ट किट बनविण्याची संकल्पना मांडली. या टीबी टेस्ट किटमुळे थुंकी मायक्रोस्कोपी, थुंकी कल्चर व जीनमध्ये असलेली निदानाची अनियमितता, लागणारा वेळ तसेच लागणार खर्च कमी करण्यास मदत होईल. या टीबी टेस्ट किटमध्ये रक्त, लघवी व थुंकीचे बायोमेट्रिक व कलर डिटेक्टशन व स्क्रिनिंग करून टीबी या आजाराचे निदान २० ते ३० मिनिटात व ६० ते ७० रुपयात करता येईल. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के.एस. वाणी, उपप्राचार्य प्रा. डॉ संजय शेखावत व संगणक विभागप्रमुख प्रा.डॉ. जी. के. पटनाईक यांनी विजयी संघाचे कौतुक केले.