सिमी खटल्यात आसिफ व परवेज खान दोषी

By admin | Published: April 1, 2017 12:51 AM2017-04-01T00:51:54+5:302017-04-01T00:51:54+5:30

न्यायालय आज शिक्षा सुनावणार : परवेज खानची रवानगी कारागृहात

Asif and Parvez Khan guilty in SIMI murder case | सिमी खटल्यात आसिफ व परवेज खान दोषी

सिमी खटल्यात आसिफ व परवेज खान दोषी

Next

जळगाव: देशभर गाजलेल्या जळगाव येथील सिमी (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया)च्या खटल्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा.जळगाव) या दोन्ही आरोपींना न्यायालयाने फौजदारी कट कारस्थान 120 (ब) या कलमान्वये शुक्रवारी दोषी ठरविले. देशविघातक कारवायांसाठी कट रचल्याचा गुन्हा दोघांविरुध्द सिध्द झाला असून शनिवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. अन्य कलमातून मात्र दोघांची निदरेष मुक्तता झाली आहे.
 महाराष्ट्रात हिंदू वस्त्यांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रय} तसेच देशविघातक कृत्य करणा:या दहा जणांविरुध्द 25 जुलै 2001 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा निकाल 19 मे 2006 रोजी लागला होता. त्यात सहा जणांना शिक्षा झाली होती तर चार जण निदरेष मुक्त झाले होते.  गुन्ह्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा.जळगाव) या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. 30 डिसेंबर 2006 रोजी आसिफला अटक करून 23 जुलै 2007 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते तर परवेजला 23 ऑगस्ट 2006 रोजी अटक करण्यात येऊन 20 ऑक्टोबर 2006 रोजी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या संपामुळे आज वकील उपलब्ध नाही, उद्या माङो वकील हजर राहतील असा अर्ज परवेज खान याने न्यायालयात सादर केला. न्या.पटनी यांनी तो अर्ज मंजूर करून शनिवारी शिक्षा सुनावली जाणार असल्याचे स्पष्ट करून परवेजची कारागृहात रवानगी केली.
 48 साक्षीदारांचे जबाब कायम
न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात पूर्वीच्या खटल्यातील 48 साक्षीदारांचे जबाब सरकारपक्षाने कायम ठेवले. तसेच तपासाधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल धर्मराज ठाकरे, विधी व न्याय मंत्रालयाचे अवर सचिव उमराव देशमुख, हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील व शेख सुपडू शेख सायबु आदींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.
आसिफ खान याला मुंबई लोकल रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने तो येरवडा कारागृहात आहे. त्याला दुपारी 3.05 वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला निकालाची माहिती देण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे 3.25 र्पयत त्यावर कामकाज चालले. आसिफ याच्यावतीने अॅड.ए.ए.खान (मालेगाव) व ए.आर.शेख (जळगाव) यांनी तर परवेज खान                      याच्यावतीने अॅड.सुनील डी.चौधरी यांनी कामकाज पाहिले.
न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात सिमी खटल्याच्या निकालावर कामकाज सुरु असताना साडे तीन वाजेच्या सुमारास न्या.पटनी यांच्या न्यायालयाच्या बाहेर एक व्यक्ती संशयास्पद फिरत होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तुम्ही कोण माझी चौकशी करणारे असे उध्दटपणे त्याने उत्तर दिले. त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी त्याच्याकडे ओळखीचा पुरावा मागितला, असता तो देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. तो परवेजचा नातेवाईक असल्याची संध्याकाळी ओळख पटली. दहशतवादी विरोधी पथकाला माहिती देऊन त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.
भ्रमणध्वनीवर बोलण्याची  परवानगी
दोषी धरल्यानंतर परवेजची कारागृहात रवानगी करण्यापूर्वी न्यायालयाने त्याला कुटुंबात तसेच अन्य नातेवाईकात कोणाशी बोलायचे असेल तर बोलू शकतो अशी परवानगी दिली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना बोलावून तशा सूचनाही दिल्या. त्यानंतर परवेजने कुटुंबाशी संपर्क साधला.
सकाळपासून कडक बंदोबस्त
निकालाच्या पाश्र्वभूमीवर न्यायालय आवारात सकाळी अकरा वाजेपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर व त्यांच्या सहका:यांनी परवेजला कारागृहात रवाना केले.

Web Title: Asif and Parvez Khan guilty in SIMI murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.