जळगावच्या सिमी खटल्यात आसिफ व परवेज खान यांना सक्तमजुरी
By admin | Published: April 1, 2017 01:30 PM2017-04-01T13:30:17+5:302017-04-01T13:30:17+5:30
दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारी 10 वर्ष सक्तमजुरी व 10 हजारांचा दंड ठोठावला.
Next
जळगाव, दि. 1- येथील सिमी (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया)च्या खटल्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा.जळगाव) या दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारी 10 वर्ष सक्तमजुरी व 10 हजारांचा दंड ठोठावला. फौजदारी कट कारस्थान 120 (ब) या कलमान्वये शुक्रवारी न्या.ए.के. पटनी यांनी या दोघांना दोषी ठरविले होते. त्यानंतर आज, शनिवारी या दोघांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.