सोबत येण्यासाठी अजितदादांकडून एका नेत्यामार्फत विचारणा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 02:23 PM2023-09-25T14:23:33+5:302023-09-25T14:24:43+5:30
भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
मुंबई- गेल्या काही दिवसापासून भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना घट्ट पकडून रहावे भाजपकडे येण्यासाठी हातपाय जोडू नये, अशी टीका गिरीष महाजन यांनी खडसे यांच्यावर केली. या टीकेला आज आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
रोहित पवार बोलले ते बरोबरच; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितलं भाजपाचं 'राजकारण
एकनाथ खडसे म्हणाले, मला सत्तेत जायचे असते तर कधीच गेलो असतो. गिरीष महाजन यांना कधीच पुढे आणलं नसतं. अनेकदा मला अजितदादांनी अमोल मिटकरींतर्फे विचारणा केली होती. तुम्ही आमच्यासोबत या असं त्यांनी म्हटले होते, पण आम्ही शरद पवार यांच्याकडे एकवेळ आलेलो आहे. मी शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. मला भाजपमध्येही येण्यासाठी आग्रह करतात. यात बावनकुळेंपासून ते विनोद तावडेंपर्यंत सगळ्यांनी आग्रह केली तरीही मी भाजपमध्ये गेलो नाही, मग अजित पवारांकडे मी कसा जाईल, असा सवालही खडसे यांनी केला.
गेल्या काही दिवसापासून भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
शरद पवारांना सोडू नका: गिरीष महाजन
गिरीष महाजन म्हणाले, "एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये, राष्ट्रवादीमध्ये राहिलेले अनेकजण आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे खडसेंनी आता शरद पवारांना घट्ट पकडून राहावं. इकडे परत येण्यासाठी पुन्हा हातपाय जोडू नका", असा टोलाही महाजन यांनी खडसेंना लगावला.