मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनपरिक्षेत्रात अस्वलाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 04:12 PM2019-02-02T16:12:39+5:302019-02-02T16:14:33+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री शिवारातील पावरा वस्तीवर छापा टाकून अस्वलाची शिकार करणाऱ्या दोन शिकाºयांसह अस्वलाचे पंजे व जबडा जप्त करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील धाबेपिंप्री शिवारातील पावरा वस्तीवर छापा टाकून अस्वलाची शिकार करणाऱ्या दोन शिकाºयांसह अस्वलाचे पंजे व जबडा जप्त करण्यात आला आहे. जळगाव गस्तीपथक व मध्य प्रदेशातील बºहाणपूर वनविभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई शनिवारी सकाळी सातला केली. अटकेतील दोघे शिकारी मुक्ताईनगर तालुक्यातील असून, एक धाबेपिंप्री येथील, तर दुसरा धामणगाव येथील आहे.
वढोदा वनपरिक्षेत्रात सातत्याने शिकारीच्या घटना उघडकीस येत आहेत. वनविभागाच्या धामणगाव गावालगतच्या वनहद्दीत नवलसिंग पावरा (रा.धाबेपिंप्री पावरा वस्ती) व कानसिंग पावरा (रा.धामणगाव) या दोघांनी अस्वलाची शिकार करून त्याचे पंजे आणि जबडा कापून नेले, तर उर्वरित अवशेष जंगलातच पुरून दिले. अस्वलाचे अवशेष विक्रीच्या उद्देशाने केलेल्या या शिकारीत अस्वलाचे पंजे जबडा घरातच लपवून ठेवल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. याआधारे जळगाव वनविभागाचे उपवनसरक्षक यांच्या मार्गदर्शनात जळगाव गस्तीपथक व मध्य प्रदेश बºहाणपूर वनविभाग यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
झडतीत शिकाºयांनी लपवून ठेवलेले अस्वलाचे कापलेले मागील दोन पाय आणि जबडा जप्त करण्यात आला आहे. या पथकात गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार, कर्मचारी आर.एच.ठाकरे, गणेश गवळी, दीपक पाटील, सी.व्ही.पाटील, प्रीतम कोळी यांचा समावेश होता. या शिकारीत दोघा शिकाºयांसह अन्य काही आरोपींचा संशय आहे. अस्वलाचे उर्वरित अवशेष मिळविण्यास हे पथक शिकार झालेल्या घटनास्थळावर शोध घेत आहे.