असोदा केंद्राची आॅनलाईन शिक्षण परिषद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 08:28 PM2020-08-31T20:28:13+5:302020-08-31T20:28:22+5:30
सर्व शिक्षक हजर : बदली शिक्षकांचा सत्कार
जळगाव : असोदा या केंद्रातील सर्व शाळांची आॅनलाईन शिक्षण परिषद नुकतीच गुगल मीटद्वारे घेण्यात आली. या शिक्षण परिषदेत असोदा केंद्रातील आव्हाणे, ममुराबाद, तरसोद, असोदा येथील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक आॅनलाईन हजर होते.
गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिमा सानप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या परिषदेच्या अध्यक्षतेखाली केंद्र्रप्रमुख भगवान वाघे होते. शिक्षण परिषदेचे तांत्रिक सहाय्य समन्वयक म्हणून तसेच सुत्रसंचलन आदी जबाबदारी तंत्रस्नेही शिक्षक संदीप पवार यांनी पार पाडली.
कोविड काळातील शाळेतील उपक्रम या विषयावर उषा सोनार, आरती चौधरी यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कोरोनाविषयी माहिती देताना काळजी कशी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन केले. निसर्ग व पर्यावरण प्रदूषण मंडळ जिल्हा जळगावचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांनी वृक्ष हेच सर्व धर्मियांचे खरे दैवत असल्याचे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनात केले. बदली होऊन आलेल्या शिक्षकांचा आभासी सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
शिक्षण परिषदेनंतर असोदा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ही आॅनलाईन शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी केंद्र्रातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.