जळगावात अवैध धंदे रोखण्यासाठी ‘एएसपी हेल्पलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 05:02 PM2018-11-27T17:02:30+5:302018-11-27T17:04:41+5:30

जळगाव शहरातील अवैध धंद्याचे उच्चाटन व महिला, मुलींची छेडखानी रोखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी ‘एएसपी हेल्पलाईन’ सुरु केली आहे.

'ASP Helpline' to prevent illegal traffic in Jalgaon | जळगावात अवैध धंदे रोखण्यासाठी ‘एएसपी हेल्पलाईन’

जळगावात अवैध धंदे रोखण्यासाठी ‘एएसपी हेल्पलाईन’

googlenewsNext
ठळक मुद्देजळगावच्या पोलीस उपअधीक्षकांनी उपलब्ध करून दिली सुविधामाहिती देणाऱ्याचे नाव पोलीस ठेवणार गोपनीयनीलाभ रोहन यांनी २४ रोजी स्विकारला पदभार

जळगाव : शहरातील अवैध धंद्याचे उच्चाटन व महिला, मुलींची छेडखानी रोखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी ‘एएसपी हेल्पलाईन’ सुरु केली असून त्यासाठी ८५३०३७५१७५ हा क्रमांक जनतेसाठी खुला केलेला आहे. नागरिकांनी अवैध धंद्याच्याबाबतीत या क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन रोहन यांनी केले आहे.
नीलाभ रोहन यांनी २४ रोजी उपविभागीय पदाचा पदभार हाती घेतला. त्यानंतर दुसºयाच दिवशी कंजरवाड्यातील दारु अड्डयावर धाड टाकून त्यांनी लाखो रुपयाची दारु व रसायन जप्त करण्यासह सात महिलांना अटक केली. त्यानंतर सोमवारपासून रोहन यांनी उपविभागातील सट्टा, मटका, जुगार, अवैध व बनावट दारु, गुटखा, वेश्या व्यवसाय, अवैध गॅस वाहतूक, महिला व मुलींची छेडखानी यासह अन्य कोणताही अवैध व्यवसायाविरुध्द मोहीम उघडली आहे.
याबाबत शहरातील सर्व सहा पोलीस स्टेशनच्या अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता माहिती द्यावी तसेच फोटोही पाठवावे. माहिती देणाºयाचे नाव देखील विचारले जाणार नाही असे रोहन यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: 'ASP Helpline' to prevent illegal traffic in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.