विद्यापीठात डांबरीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:13 AM2021-06-03T04:13:33+5:302021-06-03T04:13:33+5:30
============ एसएसबीटीत चर्चासत्र जळगाव : एसएसबीटी महाविद्यालयात ऊर्जा संक्रमण आणि ऊर्जा तंत्रज्ञान या विषयावर ऑनलाइन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र इलेक्ट्रॉनिक्स व ...
============
एसएसबीटीत चर्चासत्र
जळगाव : एसएसबीटी महाविद्यालयात ऊर्जा संक्रमण आणि ऊर्जा तंत्रज्ञान या विषयावर ऑनलाइन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे घेण्यात आले. थायलँड सॉन्गकला युनिव्हर्सिटीच्या भू-वैज्ञानिक सुश्री जेन रोझ अटवोंगयिअर यांनी मार्गदर्शन केले.
============
अष्टांग योगतर्फे जनजागृती
जळगाव : श्री अष्टांग योग बहुउद्देशीय संस्थेतर्फे तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अध्यक्ष प्रा. अविनाश कुमावत यांनी तंबाखूमुळे होणारे शरीरावरील दुष्परिणाम याबाबत पोस्टर, बॅनरद्वारे मोहीम राबवत जनजागृती केली.
============
कॅशलेस विमा योजना लागू करा
जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस विमा योजना लागू करण्यात यावी, असे पत्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे दिले आहे. कोरोना महामारीत एसटी कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन सेवा दिली. त्यामुळे त्यांना कॅशलेस उपचाराची हमी द्यायला हवी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्य चिटणीस प्रकाश अवस्थी यांनी केली होती.