न्हावी येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील परिवारांना सहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:49 PM2019-12-27T15:49:08+5:302019-12-27T15:50:02+5:30
न्हावी, ता. यावल , जि.जळगाव : सद्गुरू स्मृती महोत्सवात शुक्रवारी आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी ११ हजारांची आर्थिक ...
न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : सद्गुरू स्मृती महोत्सवात शुक्रवारी आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी ११ हजारांची आर्थिक मदत तसेच खान्देशातील संतांच्या मातांचा गौरव करण्यात आला.
येथे २४ ते ३० डिसेंबर दरम्यान सद्गुरू स्मृती महोत्सव होत आहे. द्वितीय सत्रात वक्ताश्री सद्गुरू शास्त्री भक्तिप्रकाशदासजी यांनी श्रीमद् भागवत कथेचे विवेचन केले. या सत्रात भगवान वामनजींचे चरित्र गायन केले.
दरम्यान, या महोत्सवात पंचक्रोशीतील जे शेतकरी चिंताग्रस्त होऊन आत्महत्या केली अशा पाच परिवारातील सदस्यांना ११ हजारांची आर्थिक सहाय व संतांच्या हस्ते आशीर्वाद देण्यात आले. रत्ना राजेंद्र सोनवणे (टाकरखेडा), मनोहर सुरेश पाटील (मनवेल), नीलिमा मुकेश पाटील (सावखेडासीम), महेंद्र शशिकांत पाटील (वनोली), प्रभाकर बाबूराव पाटील (भडगाव) अशी सन्मानगग्रस्तांची नावे आहेत. यापुढे कोणीही आत्महत्या करू नये, असा संदेश समाजाला देण्यात आला.
रात्रीच्या सत्रात अमितभाई सोलंकी यांच्या माध्यमातून मॅजिक शो करण्यात आला.
याप्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष गुरुवर्य सद्गुरू शास्त्री श्रीधर्मप्रसाददासजी, शास्त्री धर्मस्वरूपदासजी, स्वामी गोविंदप्रसाददासजी, देव स्वामी आदी संत उपस्थित होते.