नाशिक विभागीय पशुसंवर्धन प्रयोगशाळेच्या साहाय्यक आयुक्तांची लोंढ्रीतांड्यात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 04:19 PM2019-12-10T16:19:03+5:302019-12-10T16:20:01+5:30
लोंढ्रीतांडा, ता.जामनेर येथे नाशिक विभागीय पशुसंवर्धन प्रयोगशाळेचे सहाय्यक आयुक्त पी.डी.झोड व डॉ.आर.पी. चोपडे यांनी धाव घेऊन बाधित जनावरांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत.
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : लोंढ्रीतांडा, ता.जामनेर येथे नाशिक विभागीय पशुसंवर्धन प्रयोगशाळेचे सहाय्यक आयुक्त पी.डी.झोड व डॉ.आर.पी. चोपडे यांनी धाव घेऊन बाधित जनावरांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. संबंधित शेतातील गवतात अल्कोलाईड विषारी घटक जनावरांच्या चरण्यातून शरीरात गेल्याने जनावरे दगावली असावी, असा प्राथमिक अंदाज या आयुक्तांनी पाहणी दरम्यान मंगळवारी व्यक्त केला आहे.
नाशिक विभागीय पशुसंवर्धन प्रयोगशाळेचे सहाय्यक आयुक्त पी.डी.झोड, डॉ.आर.पी.चोपडे यांनी बाधित जनावरांची त्याचबरोबर शेतातील चाऱ्याची पाहणी केलीे. या गवतात अल्कोलाईड नावाचा विषारी घटक याठिकाणी असावा. त्यामुळे चाºयातून जनावरांना मोठ्या प्रमाणावर विषबाधा होऊन जनावरे दगावली असावी, असा प्राथमिक अंदाज येतो, असे पी.डी.झोड यांनी सांगितले. तसेच बाधित जनावरांचे प्रत्येकी पाच रक्ताचे व रक्तजलचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.
मंगळवारी कोणत्याही प्रकारचे बाधित जनावरे दगावली नसून, जवळपास ८० टक्के जनावरे पूर्वपदावर, सुस्थितीत आली आहेत. तरीही त्याठिकाणी बाधित जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती पहूरचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.जयलाल राठोड यांनी दिलीे.