बालशौर्य पुरस्कार विजेत्याच्या शोधासाठी ज्योतिषाचा आधार
By Admin | Published: May 20, 2017 12:48 PM2017-05-20T12:48:16+5:302017-05-20T12:48:16+5:30
नीलेश भिल्ल या बालकासह त्याच्या भावाचे अपहरण झाल्याच्या भीतीनंतर त्यांच्या शोधासाठी पालकांनी ज्योतिषाचा आधार
मतीन शेख/ ऑनलाइन लोकमत
मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 20 - राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारामुळे संबंध देशभर ओळख निर्माण केलेल्या नीलेश भिल्ल या बालकासह त्याच्या भावाचे अपहरण झाल्याच्या भीतीनंतर त्यांच्या शोधासाठी पालकांनी ज्योतिषाचा आधार घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली़
कोथळी येथील आशापुरी भागातील एका कुडाच्या झोपडीत वास्तव्यास असलेल्या व अठराविश्व दारिद्रय़ाशी हात करणा:या नीलेश भिल्लने दोन वर्षापूर्वी एकादशीच्या दिवशी विदर्भातील मुक्ताई मंदिराच्या बॅकवॉटरमध्ये एका बालकास बुडताना स्वत:चे प्राण धोक्यात घालून वाचवले होते. त्याच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यास राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देऊन गौरवले होत़े यानंतर लोकप्रतिनिधींसह अनेकांनी घर बांधण्यासह शैक्षणिक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले मात्र काळाच्या ओघात ते आश्वासनही हवेत विरले आहेत़ नीलेशच्या झोपडीला आजही दरवाजा नाही, अशी विदारक अवस्थेत हे कुटुंब जीवन व्यतीत करीत आहेत़
भावासह बेपत्ता झाल्याने खळबळ
सूत्रांच्या मते 15 रोजी नीलेश बेपत्ता झाला होता व पुन्हा तो 18 रोजी घरी परतला मात्र वडील बोलतील या भीतीने तो लहान भाऊ गणपत भिल्ल यास घेऊन घरातून बाहेर पडला. मुक्ताईनगर पोलिसात अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
ज्योतिषाचा आधार
पोटचा गोळा अचानक बेपत्ता झाल्याने आई वडिलांच्या मनात शंका-कुशंकांनी घर केले असतानाच त्यांनी एका ज्योतिषाकडे मुलगा नेमका कोणत्या दिशेने घरातून बाहेर पडला याबाबत विचारणा केली असता ब:हाणपूरच्या दिशेने सांगण्यात आले. त्यामुळे आई-वडीलदेखील बाहेर पडल्याची माहिती मिळाली तर नीलेशचा मधला भाऊ बक:या चारण्यासाठी गेल्याने घरी कुणीही आढळून आले नाही़
पैसे नसल्याने सायकल पडली अडगळीत
अठरा विश्व दारिद्रय़ात जीवन कंठणा:या नीलेशला पुरस्कार मिळाल्यानंतर सायकल मिळाली होती मात्र मध्यंतरी तिची रींग खराब झाल्याने केवळ पैसे नसल्याने ही सायकल झोपडीवर अडगळीत टाकण्यात आल्याचे दिसून आल़े