मांजाने कापला ओठ, पायालाही जखम; अमळनेरमधील घटना
By संजय पाटील | Updated: January 15, 2023 15:25 IST2023-01-15T15:24:40+5:302023-01-15T15:25:15+5:30
जळगावमधील अमळनेर येथे पतंगाच्या मांजाने दुचाकीस्वाराचा ओठ कापला.

मांजाने कापला ओठ, पायालाही जखम; अमळनेरमधील घटना
अमळनेर (जळगाव) : मोटारसायकलने जाणाऱ्या इसमाचा पतंगाच्या मांजाने ओठ कापला गेला. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अमळनेर येथील धुळे रोड भागात घडली.
चंद्रशेखर भावसार (५४, रा. अमळनेर) असे या जखमी इसमाचे नाव आहे. ते मोटारसायकलने बाजार समितीकडे निघाले होते. धुळे रोडवर कापलेल्या पतंगाच्या मागे बालकांचा घोळका रस्त्याने पळत होता. त्याचवेळी या पतंगाचा मांजा त्यांच्या चष्म्यात अडकला तिथून तो सरळ ओठावर आला काही कळण्याच्या आत ओठच कापला गेला. त्यांच्या उजव्या पायालाही जखम झाली आहे. भावसार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.