...अखेर कायद्याच्या चादरीवर वृद्ध ममत्व सुखावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 08:14 PM2023-03-04T20:14:37+5:302023-03-04T20:15:46+5:30

निवाऱ्यासाठी मातेचा छळ, निर्वाह न्यायाधिकरणाच्या आदेशाने दिलासा

...At last the aged Mamatva rested on the bed of the law! | ...अखेर कायद्याच्या चादरीवर वृद्ध ममत्व सुखावले!

...अखेर कायद्याच्या चादरीवर वृद्ध ममत्व सुखावले!

googlenewsNext

कुंदन पाटील/जळगाव: निधनापूर्वीच पतीने मृत्यूपत्रानुसार मालमत्तेची वाटणी करताना वृद्ध पत्नीचीही सोय केली. पतीच्या निधनानंतर सूनही माणुसकी विसरली आणि ९१ वर्षीय वृद्धेची तीन मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरसोय केली. तेव्हा बिछान्याला खिळलेल्या वृद्ध माता मरण यातना सहन करत असतानाही तिची दाद-पुकारही घ्यायला कुणीही सरसावले नाही. शेवटी नातीच्या मदतीने  ज्येष्ठ नागरीक निर्वाह न्यायाधिकरणाचे दरवाजे ठोठावले आणि न्यायाधिकरणाने तीन दिवसात वूद्ध मातेला तळमजल्यावर निवाऱ्यासाठी सोय करण्याचे आदेश काढले. तेव्हा कुठे सुखाची कुशी गवसणार म्हणून ९१ वर्षी माता क्षणभर आनंदली.

शहरातील ही वेदनादायी कहाणी. ९१ वर्षीय वृद्धेचे दोन्ही मुलांचा मृत्यू झालेला. तत्पूर्वी वृद्धेचा पती सखाराम रामभाऊ पवार (नाव बदललेले) यांनी मालमत्तेची वाटणी करताना पत्नीसाठीही सोय केली. मात्र मुलांसह सुनाही मालमत्तेच्या वादात पडल्या आणि हा वाद न्यायप्रविष्ठ होऊ बसला. तेव्हा दुसऱ्या मजल्यावर वास्तव्याला ठेवलेल्या जनाबाई (नाव बदललेले) यांच्या स्वयंपाकासाठी लावलेल्या महिलेव्यतिरिक्त कुणीही आधार उरला नाही. वरच्या मजल्यावर असल्याने तिच्या वेदनांनाही कुणी वाचायला तयार नव्हते. तेव्हा बिछान्याला खिळलेल्या या वृद्धेने ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे दरवाजे ठोठावले. तेव्हा या न्यायाधिकरणाचे पिठासन अधिकारी महेश सुधळकर यांनी वृद्धेच्या वेदना ऐकून त्यांनाही गहिवरुन आले. त्यांनी न्यायप्रविष्ठ वादही जाणून घेतला. त्यानंतर या नाजूकशा प्रकरणात तातडीने निवाडा केला.

तीन दिवसांचा दिला अल्टीमेटम

अर्जदार जनाबाई यांचा अर्ज मंजूर करीतसून आणि नातवाने तीन दिवसात वृद्धेची तळमजल्यातील खोलीत रहिवासासाठी उपलब्ध करुन द्यावी. तसेच न केल्यास पोलिसांच्या मदतीने भाडेकरुकडून घर खाली करुन वृद्धेला ती खोली वास्तव्यासासाठी उपलब्ध करुन द्यावी.वृद्धेने मागणी केल्यास पोलीस संरक्षणही पुरविण्यात यावे, असे सुधळकर यांनी आदेशात म्हटले आहे.

माणूस म्हणून खूप वेदना झाल्या.वृद्धेच्या वेदनाही भयंकर होत्या. पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ नुसार या प्रकरणात आदेश काढण्यात आलेले आहेत. नक्कीच वृद्धेला सुखदायी निवाऱ्यासाठी जागा उपलब्ध होण्यास मदत होईल. -महेश सुधळकर, उपजिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी, ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण, जळगाव.

Web Title: ...At last the aged Mamatva rested on the bed of the law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव