कमालच म्हणावी, शिपायाला कार्यमुक्त करण्यासाठी तब्बल एक लाख ८० हजाराची लाच; लाचखोर लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यात

By विजय.सैतवाल | Published: August 22, 2024 12:11 AM2024-08-22T00:11:11+5:302024-08-22T00:11:34+5:30

तक्रारदार हे यावल येथील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्यांची स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी यातील नरेंद्र खाचणे याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती.

At most, a bribe of one lakh 80 thousand to relieve the peon | कमालच म्हणावी, शिपायाला कार्यमुक्त करण्यासाठी तब्बल एक लाख ८० हजाराची लाच; लाचखोर लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यात

कमालच म्हणावी, शिपायाला कार्यमुक्त करण्यासाठी तब्बल एक लाख ८० हजाराची लाच; लाचखोर लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यात

जळगाव : बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी एक लाख ८० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदमधील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीक नरेंद्र किशोर खाचणे (५२) याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (२१ ऑगस्ट) रात्री करण्यात आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे यावल येथील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्यांची स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी यातील नरेंद्र खाचणे याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती.

याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून बुधवारी (२१ ऑगस्ट) लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, एन. एन. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, पोलिस नाईक बाळू मराठे, सुनील वानखेडे, पोकॉ राकेश दुसाणे, प्रणेश ठाकुर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी यांनी सापळा रचला. तडजोडी अंती तक्रादाराकडून एक लाख ८० हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: At most, a bribe of one lakh 80 thousand to relieve the peon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.