"एकेकाळी कापसाला ७ हजार भाव मागणारे महाजन, आज मंत्री असताना फॉरेनला फिरतायंत"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 04:15 PM2023-05-25T16:15:31+5:302023-05-25T16:30:18+5:30

कपाशीला ७ हजार भाव मागणारे गिरीश महाजन आता कुठे गेले, असा सवाल केला. 

"At one time Mahajan asking for 7000 price for cotton is now traveling abroad", Eknath Khadse on girish mahajan | "एकेकाळी कापसाला ७ हजार भाव मागणारे महाजन, आज मंत्री असताना फॉरेनला फिरतायंत"

"एकेकाळी कापसाला ७ हजार भाव मागणारे महाजन, आज मंत्री असताना फॉरेनला फिरतायंत"

googlenewsNext

जळगाव - जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात सातत्याने खटके उडत असतात. एकनाथ खडसेंकडूनगिरीश महाजनांवर टीका केली जाते, तर महाजनही त्या टीकेला पलटवार करताना दिसून येते. आता, पुन्हा एकदा खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विदेश दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका केलीय. जामनेर येथील शेतकऱ्यांच्या विविध पिकाला हमीभाव मागणीसाठी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. यावेळी, कपाशीला ७ हजार भाव मागणारे गिरीश महाजन आता कुठे गेले, असा सवाल केला. 

शेतकऱ्यांच्या कापसाला १५ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, कांद्याला पाच हजार रुपये हमीभाव देण्यात यावा पिक विमा कंपनीकडून मदत मिळावी, वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. महावितरणा करून शेतकऱ्यांचे वीज तोडणी थांबवण्यात यावी, शेती पंपाला दिवसा बारा तास सुरळीत देण्यात यावी, अशा मागण्यासाठी एक दिवशी लक्ष उपोषण राष्ट्रवादीतर्फे जामनेर येथे करण्यात आले आहे. 
          
आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले की, जळगाव जिल्ह्यामध्ये ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोघे एकनाथ शिंदे व फडणवीस यांचे जवळचे असून त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाच्या हमीभावासाठी बोललं पाहिजे. कारण, जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कपाशी पिकाला भाव मिळत नाही, एकेकाळी गिरीश महाजन यांनी सात हजार रुपये कपाशीला भाव मिळण्यासाठी आंदोलन केले होते. मग, आता गेले कुठे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते फॉरेन दौऱ्यावर फिरत आहेत, अशी टीकाही खडसे यांनी केली. 

आज शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही कपाशीला भाव नाही, ज्वारीला भाव नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील  झाला असून उद्या नवीन कपाशी पिकाची लागवड होणार आहे. मात्र कपाशीला भाव नसल्यामुळे आजही मागच्या वर्षाची कपाशी घरात पडून आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे अशी प्रतिक्रिया जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आलेल्या एकदिवसीय लक्षणिक उपोषण प्रसंगी बोलताना एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

Web Title: "At one time Mahajan asking for 7000 price for cotton is now traveling abroad", Eknath Khadse on girish mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.