पाचोरा येथे प्रांताधिकाऱ्यांच्या घरावर वाळूमाफियांकडून दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:29 PM2018-05-12T12:29:29+5:302018-05-12T12:29:29+5:30
मध्यरात्रीची घटना
आॅनलाइन लोकमत
पाचोरा, जि. जळगाव, दि. १२ - पाचोरा येथे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या घरावर वाळू माफियांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
सध्या जळगाव जिल्ह्यात वाळूचा मुद्दा चांगलाच गाजत असून दोनच दिवसांपूर्वी जळगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला डंपरने उडविण्याचा प्रयत्न झाला होता तर त्यापूर्वी वाळूच्या डंपर दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये तीन जणांना उडविले होते.
जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढतच असून पाचोरा येथे तर थेट प्रांताधिकाºयांच्याच घरावर दगडफेक केल्याने खळबळ उडाली आहे. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचे पाचोरा येथील कृष्णाजी नगर भागात निवासस्थान आहे. शुक्रवारी मध्यरात्री या ठिकाणी अचानक दुचाकीवर आलेल्यांनी घरावर दगडफेक केली. यामध्ये त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या. वाळूमाफियांनी ही दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे.