अकलूदच्या हॉटेल किनारावर धाड
By admin | Published: May 5, 2017 12:20 AM2017-05-05T00:20:54+5:302017-05-05T00:20:54+5:30
मालकासह व्यवस्थापकाला अटक : लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त
फैजपूर : भुसावळ रोडवरील अकलूद शिवारातील हॉटेल किनारावर भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, फैजपूर पोलिसांच्या पथकाने घातलेल्या संयुक्त धाडीत बेकायदा विक्रीसाठी ठेवण्यात आलेला लाखाचा मद्यसाठा व 20 हजार रुपये रोख असा 1 लाख 15 हजार 159 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केल्याने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई 3 च्या मध्यरात्री करण्यात आली. हॉटेल मालक हेमंत पृथ्वीराज (वय 48) (भुसावळ) व मॅनेजर गोपाळ पंडित कोळी (अकलूद) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 3 च्या रात्री सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, फौजदार रामलाल साठे, हे.कॉ. जिजाबराव पाटील, सहायक फौजदार विजय पाचपोळ, चालक तायडे यांनी अकलूद शिवारात हॉटेल किनारावर अचानक धाड टाकून अवैध विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या व परवाना नसताना विक्री करीत असताना देशी-विदेशी मद्याचा साठा बियरच्या बाटल्या आढळून आल्या.
मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाईप्रकरणी सहायक पाचपोळ यांनी फिर्याद दिल्यावरून हॉटेल मालक हेमंत पृथ्वीराज फालक व व्यवस्थापक गोपाळ पंडित कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तपास सपोनि सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनोहर मोरे करीत आहे. (वार्ताहर)