जळगावात ३ हजार गणेश भक्तांचे अथर्वशीर्ष पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:13 PM2018-09-17T15:13:33+5:302018-09-17T15:19:12+5:30
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत सुमारे ३ हजार गणेश भक्तांनी विश्व कल्याणासाठी रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत अथर्वशीर्ष पठण केले.
जळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत सुमारे ३ हजार गणेश भक्तांनी विश्व कल्याणासाठी रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत अथर्वशीर्ष पठण केले.ओंकार ध्वनी, शंखनाद व ५० हजारांपेक्षा अधिक सामूहिक आवर्तनाने सुभाष चौक परिसर मंगलमय झाला होता़ निमित्त होते सुभाष चौक मित्र मंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था व स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अथर्वशीर्ष पठणाचे.
भव्य अशा मंडपात भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख आचार्य पंडित महेशकुमार त्रिपाठी आणि स्वामी समर्थ केंद्राचे जिल्हाप्रमुख विजय निकम यांनी अथर्वशीर्षाचे माहात्म्य सांगितले.
श्री गणेश विद्येची देवता असून पहिली ते उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांनी गणेशाची आराधना करावी, गणपतीच्या कृपेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागते तसेच सुसंस्कारित भावी पिढी निर्माण होते, असे ते म्हणाले़
यानंतर गणपती पूजन, ओंकार ध्वनी, शंखनाद शांतीपाठाद्वारे अथर्वशीर्षाला सुरुवात झाली़
यावेळी गणपतीवर दुग्धाभिषेक अनंत कासार दाम्पत्य, तर दुर्वाभिषेक पूनम अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले़ सूत्रसंचालन संजय गांधी, तर आभार विजय जगताप यांनी मानले़
अथर्वशीर्ष पठणाच्या या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीकांत खटोड, मनीष अग्रवाल, प्रवीण बांगर, संजय पांडे, भरतकुमार शहा, गोपाल पाटील, अलोक अग्रवाल, अक्षय खटोड, नरेंद्र कापडणे, महेश दायमा, मयूर कासार, महेश गोला, सिद्धार्थ दाधिच, सचिन शर्मा, अमित कासार, पंकज गव्हाळे, प्रमोद भामरे, पराग सरोदे, रवींद्र बारी, संतोष जगताप, अनिल नारखेडे, मयूर जाधव, दत्तू विसपुते, आकाश भक्कड यांच्यासह पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़