टपरीसह एटीएम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 09:59 PM2020-01-14T21:59:28+5:302020-01-14T21:59:35+5:30
जामठी येथील घटना : श्वान पथकाला केले पाचारण
बोदवड : तालुक्यातील जामठी येथे १४ मध्यरात्रीच्या दरम्यान खासगी कंपनीचे एटीएम मशीन व बाजूलाच असलेली पानटपरी चोरट्यांनी फोडली. यात एटीएमची रक्कम सुरक्षित आहे तर टपरीतून रोख रक्कम, सिगरेटीे पाकिटे व शितपेयाच्या बाटल्या असा सात हजाराचा माल लंपास केला.
सकाळी सात वाजेच्या दरम्यान ैैहा प्रकार लक्षात आला. सदर एटीएमचे शटर वाकवून एटीएम मशीन कुदळ व टॉमीच्या सहय्याने चोरट्यांनी फोडले परंतु सदर एटीएमच्या आतील लॉक व रोख रक्कमेचा ट्रे फोडण्यात अपयश आल्याने त्यांनी मशीनचे व तेथील सीसीटीव्हीचे नुकसान केले. त्यानंतर बाजूलाच संदीप बी माळकर यांची असलेली पानटपरी त्यांनी फोटली. तर बाजूलाच बसून दारू रिचवल्याचेही तेथे पडलेल्या बाटल्यांवरुन दिसून येते.
एटीएम मध्ये होते
साडेतीन हजार रुपये
जे एटीएम फोडण्यासाठी चोरटे आले होते, त्यामध्ये बारा रोजी एक लाख रुपये लोड करण्यात आले होते त्यातून ग्राहकांनी पैसे काढल्यामुळे फक्त साडेतीन हजाराची रोकड त्यात शिल्लक होती. ती रक्कमही सुरक्षित राहिली मात्र तेथील तेथील साहित्याचे नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती कळताच बोदवड पोलीस पथक तसेच मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, जिल्हा पोलिसांचे श्वान पथकातील श्वान जंजीर यांचे सोबत संदीप परदेशी निलेश झोपे, तसेच ठसे तज्ञ दाखल झाले होते.
याबाबत बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान या घटनेने गावात व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जंजीर श्वानाने दाखवला रस्त्यापर्यंत मार्ग
पोलीस पथकातील श्वान जंजीरला आरोपींनी चोरीत वापरलेल्या सळईचा वास दिला असता त्याने थेट पळत राजणी गावाकडे जाणाºया रस्त्याचा मार्ग दाखवला असून सदर रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही चे चित्रण पोलीस पथक तपासत आहे.