ए.टी.पाटलांनी निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:45 PM2019-04-03T12:45:44+5:302019-04-03T12:46:42+5:30

शिरीष चौधरी अर्ज भरणार नाहीत

A.T.Patel should contest the election and save the deposit - Girish Mahajan | ए.टी.पाटलांनी निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे - गिरीश महाजन

ए.टी.पाटलांनी निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे - गिरीश महाजन

Next

जळगाव : खासदार ए.टी.पाटील यांचे कार्यकर्तृत्व फार मोठे असून, त्यांनी आपल्या मतदार संघात खूप विकासाचे कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढली पाहिले, असा खोचक टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा खासदारांना लगावला आहे. तसेच त्यांनी ही निवडणूक लढवून आपले डिपॉझीट वाचवून दाखवावे, असे आव्हानही महाजन यांनी ए.टी.पाटील यांना दिले आहे.
गिरीश महाजन यांनी मंगळवारी शहरातील संपर्क कार्यालयात भाजपा नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
महाजन म्हणाले, खासदार ए. टी. पाटील यांनी फार मोठे काम केले आहे. जर त्यांना वाटत असेल की आपण निवडणूक लढवली तर निवडून येवू शकतो. तर त्यांनी खुशाल निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी माझ्यावर आपले तिकीट कापल्याचा आरोप केला असून, सध्या त्यांची समजूत काढण्याचा किंवा त्यांची भेट घेण्याचा कोणताच प्रश्न येत नसल्याचेही महाजन म्हणाले.
धुळ्यात अनिल गोटे यांना देखील आपण आव्हान दिले होते. तर यावेळेस आपण ए.टी.पाटील यांना डिपॉझीट वाचविण्याचे आव्हान देत असल्याचे ते म्हणाले.
गावीतांच्या पक्षप्रवेशाबाबत दोन दिवस वाट पहा
अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. या संदर्भात गिरीश महाजन यांना विचारणा केली असताना चौधरी अर्ज भरणार नसल्याची माहिती महाजन यांनी दिली. तसेच नंदुरबारचे माजी खासदार माणिकराव गावीत यांचा मुलगा भरत गावीत यांच्या प्रवेशाबाबत आता काही सांगता येत नसून, दोन दिवस वाट पहा, असे सूचक वक्तव्य महाजन यांनी केले.

 

Web Title: A.T.Patel should contest the election and save the deposit - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.