बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:12 PM2018-11-18T22:12:34+5:302018-11-18T22:14:42+5:30
बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे नातलगांकडे सन २०१६ मध्ये शिक्षणासाठी आलेल्या १७ वर्ष चार महिन्यांच्या अल्पवयीन तरुणीवर तालुक्यातच शेलवड येथील तरुणाने अत्याचार करीत व्हिडिओ चित्रण करून खंडणी मागत असल्याचा गुन्हा १८ आज रोजी जळगाव औद्योगिक वसाहत पोलिसात अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात शून्य क्रमांकाने वर्ग झाला आहे.
बोदवड, जि.जळगाव : बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे नातलगांकडे सन २०१६ मध्ये शिक्षणासाठी आलेल्या १७ वर्ष चार महिन्यांच्या अल्पवयीन तरुणीवर तालुक्यातच शेलवड येथील तरुणाने अत्याचार करीत व्हिडिओ चित्रण करून खंडणी मागत असल्याचा गुन्हा १८ आज रोजी जळगाव औद्योगिक वसाहत पोलिसात अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात शून्य क्रमांकाने वर्ग झाला आहे.
सन २०१६ मध्ये नाडगाव येथील नातलगांकडे शिक्षणासाठी १७ वर्ष चार महिन्याची तरुणी आली होती. यादरम्यान ३१ मार्च २०१६ मध्ये बोदवड येथील हायस्कूलमध्ये दहावीचा शेवटचा पेपर देऊन घरी परतत होती. नातलगांकडे पिण्याच्या पाण्याची कॅन घेऊन येणाऱ्या ओळख असलेल्या संशयित आरोपी सचिन नामक तरुणाने रा.शेलवड याने दुचाकीवरून घरी सोडून देत असल्याचे कारण सांगत दुचाकीवर बसवले व बोदवड येथील जय बजरंग जिनिगच्या गोदामावर नेले. तेव्हा या तरुणीने कोठे घेऊन आला, असे विचारले. त्या वेळी या तरुणाने गोदामात नेऊन जबरदस्तीने बदनामीची धमकी देत अत्याचार केला. तसेच या घटनेबाबत काही वाच्यता केल्यास व्हिडिओ चित्रण सोशल मीडियावर टाकण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली.
हा प्रकार नंतर सदर तरुणी जळगाव येथे पुढील शिक्षणासाठी गेली. तेव्हा सदर घटना दिवसापासून ते ८ नोव्हेंबर २०१८ पावेतो वेळोवेळी अशील केलेला व्हिडिओ चित्रण सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत होता. वारंवारंच्या तगाद्याने तरुणी घाबरली होती.
मित्राने धीर देत दिली वाच्यता फोडण्यास मदत
या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीला सोबत शिकत असलेला मित्र याने विश्वासात घेत माहिती विचार असता तरुणीने ैही घटना कथन केली. या तरुणाने संशयित आरोपीस हटकले. मला दहा हजार द्या, अन्यथा विडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याने दोन हजार रुपयेही घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर तरुणीला धीर देत नातलगांना माहिती देत आज जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी हा गुन्हा दाखल करीत बोदवड पोलिसात शून्य क्रमांकाने वर्ग केला. बोदवड पोलीस ठाण्यात भाग पाच, कलम ३७६, ३८४, ५०६, बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम २०१२ च्या ३व ४ नुसार पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप चौधरी, संदीप वानखेडे हे करीत आहे.