खाऊचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:04 PM2020-07-11T12:04:10+5:302020-07-11T12:04:45+5:30

संतापजनक : नराधमाचा शोध सुरु, १० वर्षीय चिमुरडीवर ओढावला प्रसंग

Atrocities on girls by showing lure of food | खाऊचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

खाऊचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

Next

जळगाव : खाऊचे आमिष दाखवत गोलाणी व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर १० वर्षीय बालिकेला नेऊन तिच्यावर एका नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेची माहिती मिळताच सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी घटनास्थळी भेट दिली.


पीडितेच्या आत्याने दिलेल्या माहितीनुसार, सराफ बाजार परिसरात पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. भवानी मंदिराजवळ बालिका आत्यासोबत जेवण करत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने खाऊ देतो असे सांगून तिला वाहनावर बसवून गोलाणी व्यापारी संकुलात आणले. तेथे तिसºया मजल्यावरील बंद गाळ्यातील शौचालयात बालिकेला नेले व तिच्यावर अत्याचार करून तो भामटा दुचाकीने फरार झाला.

...असा समोर आला प्रकार
पीडितेवर अत्याचार झाल्यानंतर ती जखमी अवस्थेत रडत वृध्दा आत्याकडे गेली़ तिने संपूर्ण हकीकत आत्याला सांगितली़ नंतर आत्याने शहर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला़ शिवसेना कार्यकर्त्या मंगला बारी यांनाही एका बालिकेवर अत्याचार झाल्याचे कळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली़ परंतु, पोलिसांना त्याठिकाणी कुणीही आढळून आले नाही़ त्यांनतर पीडितेवर उपचार करण्यात आले़

पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी
सायंकाळी अपर पोलीस अधीक्षका भाग्यश्री नवटके व सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांनी शहर पोलीस ठाणे गाठत पीडितेची विचारपूस केली. काही वेळानंतर पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांनी सराफ बाजार, सुभाष चौक तसेच गोलाणी मार्केट परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली. शहर ठाण्याच्या पथकाने पीडितेने सांगितलेल्या माहितीनुसार सुभाष चौक ते गोलाणी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलनास सुरवात केली.
 

Web Title: Atrocities on girls by showing lure of food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.