एटीएसची जळगावात छापेमारी, पहाटे चार वाजता झाली कारवाई

By सुनील पाटील | Published: September 22, 2022 03:30 PM2022-09-22T15:30:35+5:302022-09-22T15:31:18+5:30

धार्मिक स्थळातून एकाला घेतले ताब्यात.

ATS raid in Jalgaon action was taken at four in the morning | एटीएसची जळगावात छापेमारी, पहाटे चार वाजता झाली कारवाई

एटीएसची जळगावात छापेमारी, पहाटे चार वाजता झाली कारवाई

Next

जळगाव : अकोला दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी पहाटे चार वाजता मेहरुणमधील दत्त नगरातील एका धार्मिकस्थळावर छापा टाकला. त्यात अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय ३२) याला ताब्यात घेतले आहे. मोमीन हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेचा महाराष्ट्रातील खजिनदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारत सरकारविरुद्ध चिथावणीसह विविध स्वरुपाच्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवार पहाटेच्या सुमारास एकाचवेळी देशभरात १०० पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली तर महाराष्ट्रात एटीएसने २६ ठिकाणी छापेमारी केली. औरंगाबाद येथेही काही जणांना ताब्यात घेण्यात आले. दहशतवादी विरोधी पथकाच्या अकोला युनीटचे पोलीस उपनिरीक्षक गौरव सराग, हवालदार अनिल देवरनकर, सचिन चव्हाण, योगेश सतरकर, रिजवान आदींचे पथक तीन वाहनाने पहाटे तीन वाजता जळगावात दाखल झाले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन पथक पहाटे चार वाजता मेहरुणमधील दत्त नगरातील धार्मिकस्थळावर धडकले.

तेथे वरच्या मजल्यावर झोपलेल्या तिघांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यापैकी चौकशी अंती दोन जणांना सोडून देण्यात आले तर अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात नोंद करुन हे पथक औरंगाबादला रवाना झाले. दरम्यान, मोमीन हा बुधवारी सायंकाळीच जळगावात आला होता. त्याला कोणी आश्रय दिला, त्याचाही यात काही सहभाग आहे का? याची गुप्त चौकशी सुरु झालेली आहे.

मुंबईतील गुन्ह्यात घेतले ताब्यात
मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात गु.र.नं २१/२०२२ कलम १२१-ए,१५३, ए, १२० ब, १०९ सहकलम १३ (१)(ब) युएपी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यात अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन हा आरोपी आहे. त्याच गुन्ह्यात एटीएसच्या अकोला युनीटने त्याला ताब्यात घेतले.

Web Title: ATS raid in Jalgaon action was taken at four in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.