देवझीरी वनक्षेत्रात वनविभागाच्या पथकावर हल्ला, सागवान तस्करांनी केली तुफान दगडफेक; हवेत गोळीबार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:41 PM2021-02-23T23:41:24+5:302021-02-23T23:41:37+5:30

सातपुड्यातील देवझीरी वनक्षेत्रात उभ्या झाडांची कत्तल करीत असताना मज्जाव केल्याने वनकर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली.

attack on Forest Department squad in Devziri forest area | देवझीरी वनक्षेत्रात वनविभागाच्या पथकावर हल्ला, सागवान तस्करांनी केली तुफान दगडफेक; हवेत गोळीबार 

देवझीरी वनक्षेत्रात वनविभागाच्या पथकावर हल्ला, सागवान तस्करांनी केली तुफान दगडफेक; हवेत गोळीबार 

googlenewsNext

चोपडा :  सातपुड्यातील देवझीरी वनक्षेत्रात उभ्या झाडांची कत्तल करीत असताना मज्जाव केल्याने वनकर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत आठ कर्मचारी जखमी झाले. यावेळी जमाव पांगविण्यासाठी हवेत गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या. याबाबत ३० ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत  वनसुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, २२ रोजी संध्याकाळी ५ वाजता रविंद्र रेवसिंग बारेला यास भागडया भिलाला रा, मोहनपुरा ता.वरला जि. बडवाणी याने वनकर्मचाऱ्यांना लाकडे तोडू दिले नाही  म्हणून " बघा आम्ही काय करतो?" असा दम दिला. यानंतर २२ रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान  देवझिरी वन विभागाच्या  परिसरातवासुपॉइट ते पाटी कॅम्पचे मध्यभागी  जंगलात ३० ते ३५ अनोळखी इसम २५ ते ३० झाडे तोडत असतांना दिसले. त्यांना  प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी  गोफणीने दगडं मारुन  एसआरपीएफचे जवान व वन विभागाचे कर्मचारी व रोजंदारीचे कर्मचारी यांना दुखापत  केली.  आरोपींनी कुऱ्हाडही फेकली असता एसआरपीचे शे.आसीफ शे.अकबर यांनी दोन प्लॅस्टिक गोळयांचे फायर केल्यानंतर एक रिकामी केस घटनास्थळी मिळून आली असून एक रिकामे केस हे गहाळ झालेले आहे. याबाबत  आडवद पोलीस ठाण्यात वनक्षेत्रपाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात  ३० ते ३५ इसमांविरुध्द भादवि लम ३५३, ३३२,१४३,१४७,१४८,१४९,४२७ ५०६, मुपो एक्ट १३५ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान,  दगडफेकीत  वनपाल प्रकाश बळीराम महाजन ,  वनरक्षक नरेंद्र सुभाष चित्ते, वनरक्षक रोहित सिताराम पावरा, वनसेवक साई फकीरा बारेला, भाऊसिंग गाठया बारेला, हवालदार  के. आर. शिंदे, डि. बी. सपकाळे, एस. एन. पाटील हे जखमी झाले.  जखमींवर   वैजापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यावर त्यांना  अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल  केले आहे. तर अनोळखी इसमांनी तोडलेल्या सागवानी  लाकडांचा पंचनामा  करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोकुळ बयास हे करीत आहेत.

Web Title: attack on Forest Department squad in Devziri forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.