मजुरीच्या पैशावरुन घातली डोक्यात कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:46 IST2018-07-11T12:42:57+5:302018-07-11T12:46:36+5:30
चोपडा शहरात घडली घटना

मजुरीच्या पैशावरुन घातली डोक्यात कु-हाड
जळगाव : मजुरीच्या पैशावरुन वाद होऊन मालकाच्या मुलाने दीपक योगराज लोहार (वय ३५, रा.पाटीलवाडा, चोपडा) या तरुणाच्या डोक्यात कु-हाड घातल्याची घटना मंगळवारी सकाळी चोपडा शहरात घडली. जखमी दीपक याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
दीपक याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार राजू सैय्यद यांच्याकडे दीपक मजुरीने सुतारकाम करीत होता. मंगळवारी कामावर असताना मजुरीच्या पैशावरुन राजू सैय्यद व दीपक यांच्यात वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या राजू याने मुलगा रशीद याला बोलावून दीपकच्या डोक्यात कु-हाडीने हल्ला करण्याची चिथावणी दिली. त्यानंतर लगेच रशीद याने दीपक याच्या डोक्यात कुºहाड घातली. या हल्लयात दीपक याची कवटी बाहेर आली असून रक्तबंबाळ अवस्थेत त्याला ओळखीच्या लोकांनी चोपडा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.