पहूर येथे तरुणावर कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 08:31 PM2019-09-22T20:31:57+5:302019-09-22T20:34:17+5:30
जुन्या वादातून घडला प्रकार : लोखंडी रॉडने मारहाण
पहूर, ता. जामनेर : येथे लोंढ्री येथील एका तरुणावर कोयत्याने दोन वार करून लोंखडी रॉडने गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. राजमल अर्जुन बोरसे (वय ३२) असे युवकाचे नाव आहे. हल्ला करणारे शेरी (ता.जामनेर) येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, राजमल अर्जुन बोरसे हा गाडीत डिझेल भरण्यासाठी जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर आला होता. यादरम्यान शेरी येथील तीन जणांनी कोयत्याचे दोन वार राजमलवर केले. याचबरोबर लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमीवर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजूषा पाटील यांनी प्राथमिक उपचार केले आहे. पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या घटनेच्या काही वेळ आधी पहूर बसस्थानक परीसरात जामनेर रोडवर राजमल बोरसे व शेरीतील रमेश शिंदे यांच्यात बाचाबाची झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांच्याकडे जखमी व हल्लेखोर दोन्हींचे भांडण झाल्याबाबत तक्रार दिली होती. मात्र काही पदाधिका-यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला होता. त्यानंतर हा प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी पहूर पोलीसात उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता तर जळगाववरून शुन्यने पहूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद होईल, असे साहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांनी सांगितले.
शुक्रवारी पदभार घेतलेले नवनियुक्त साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी हे पहूर हद्दीत वारंवार निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न कसा हातळतात याकडे लक्ष लागून आहे. शनिवारीही ग्रामीण रुग्णालयात संतप्त जमावातून हिसंक वळण लागण्याचा प्रयत्न झाला. यामुळे पोलीसांचा धाक संपुष्टात आल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे.
कँप्शन पहूर ग्रामीण रूग्णालयात प्राणघातक हल्ला झालेल्या राजमलवर प्राथमिक उपचार केले.
या घटनेच्या काही वेळ आधी पहूर बसस्थानक परिसरात जामनेर रोडवर राजमल बोरसे व शेरीतील रमेश शिंदे यांच्यात बाचाबाची झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांच्याकडे जखमी व हल्लेखोर दोन्हींचे भांडण झाल्याबाबत तक्रार दिली होती. मात्र काही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला होता. त्यानंतर हा प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली.