रात्रीच्या गस्तीत चोरट्यांचा पोलिसांवरच हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:05 PM2019-05-25T12:05:40+5:302019-05-25T12:06:39+5:30

चौघांना अटक

Attacking the police in the night of thieves | रात्रीच्या गस्तीत चोरट्यांचा पोलिसांवरच हल्ला

रात्रीच्या गस्तीत चोरट्यांचा पोलिसांवरच हल्ला

Next

जळगाव : एका बंद बंगल्यात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघा चोरट्यांना रामानंद नगर पोलिसांनी पकडले असता त्यांनी पोलिसांवरच प्रतिहल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजता सेंट जोसेफ हायस्कूल जवळ घडली. ऋतिकभास्कर जाधव (रा.जालना), शे.जावेद शे.भुरु, अब्दुल उर्फ सोनू नसीम अब्दुल हाफीज (रा.नागपूर) व शे.छोटू शे.दीलावर (रा.गेवराई) अशी चौघांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, निलेश सूर्यवंशी, विजय खैरे, किरण धनगर, रवी पाटील व विलास शिंदे यांचे पथक गस्तीवर असताना मीनाताई ठाकरे कॉंप्लेक्स परिसरात एका बंद बंगल्यात चोर घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक तत्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहून चोरट्यांनी पळ काढला. पाठलाग करतांना त्यांनी पोलिसांवरच प्रतिहल्ला केला.
नागपूर, अमरावतीला घरफोड्या
या चौघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांनी चौकशीत नागपूर,अमरावती व इतर ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून अनेक घरफोडी उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असून घरफोडीच्या गुन्ह्यात हस्तांतर करण्यात आले आहे. तपास उपनिरीक्षक कांचन काळे करीत आहेत.

Web Title: Attacking the police in the night of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव