वाकोद येथे सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:19 AM2021-08-15T04:19:14+5:302021-08-15T04:19:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाकोद, ता. जामनेर : येथील भर बाजारपट्टा व वस्तीत असलेल्या हितेश शंकरलाल जैन यांच्या मालकीचे हितेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाकोद, ता. जामनेर : येथील भर बाजारपट्टा व वस्तीत असलेल्या हितेश शंकरलाल जैन यांच्या मालकीचे हितेश ज्वेलर्स शटर कापून धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. चोरी करण्यासाठी आलेले चोरटे आपल्याकडे असलेले चारचाकी वाहन घटनास्थळी सोडून गेले आहे. चोरट्यांच्या गाडीत लोखंडी टॉमी, आणि मोठा घनदेखील आढळून आला आहे.
भर चौकात असलेल्या हितेश ज्वेलर्सच्या रोलिंग शटरच्या लोखंडी लॉक पट्ट्या कापण्यात आल्या आहे व शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता डाव फसला. यामुळे व्यापारी वर्गात घबराट निर्माण झाली आहे.
हितेश ज्वेलर्ससमोर चोरट्यांनी एमएच-२०-बीएन-३८२७ या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार लावलेली दिसून आली. या कारमध्ये लोखंडी टॉमी व घन आढळून आल्याने चोरटे धाडसी चोरीच्या प्रयत्नात होते, असे दिसते.
शनिवारी सकाळी घटनास्थळी पहूर पोलिसांनी माहिती घेऊन घटनास्थळी आढळून आलेली बेवारस चारचाकी ताब्यात घेतली असून, तपास सुरू केला आहे.
वाहन चोरीचे की काय?
घटनास्थळी बेवारस कार आढळली. यात लोखंडी टॉमी आणि घन आढळून आले असल्याने ही कार चोरट्यांची असल्याची खात्री होते. ही कार घटनास्थळी सोडल्याने तीदेखील चोरीची आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोऱ्यांचे वाढत प्रमाण लक्षात घेता रात्रीची गस्ती घालविण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.