जळगाव जिल्ह्यात १३ बसेसवर दगडफेक व चालकाला जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 09:41 PM2018-01-02T21:41:15+5:302018-01-02T21:45:45+5:30
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्'ात तीव्र पडसाद उमटले. जिल्ह्यात एकूण १३ बसेसवर दगडफेक झाली.जळगाव शहरात एस.टी.बसची तोडफोड करुन चालकासह बसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. जैनाबादमध्येही बसवर दगडफेक झाली. अमळनेर येथे सात एस.टी.बसेस व दोन ट्रक तर चाळीसगाव येथे चार बसेसवर दगडफेक झाली. अमळनेरच्या घटनेत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि २ : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्'ात तीव्र पडसाद उमटले. जिल्ह्यात एकूण १३ बसेसवर दगडफेक झाली.जळगाव शहरात एस.टी.बसची तोडफोड करुन चालकासह बसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. जैनाबादमध्येही बसवर दगडफेक झाली. अमळनेर येथे सात एस.टी.बसेस व दोन ट्रक तर चाळीसगाव येथे चार बसेसवर दगडफेक झाली. अमळनेरच्या घटनेत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.
चोपडा आगाराच्या चोपडा-जळगाव या एस.टी.बसवर शिव कॉलनीनजीक रेल्वे उड्डाणपुलाजवळ दहा ते पंधरा जणांचा जमावाने दगडफेक केली. बस थांबताच चालक जगतराव लोटन पाटील (वय ५५ रा.चोपडा) यांच्या अंगावर व सीटवर पेट्रोल टाकले. त्यानंतर लागलीच पेटती काडी फेकली. सीटने पेट घेताच चालक जागेवरुन उठले. तर दुसरीकडे अन्य जणांकडून बसवर दगडफेक झाली. यात सखुबाई नाना भील (वय ६८,रा.किनगाव, ता.यावल) व डिंगबर महाजन (वय १७ रा.जळगाव) हा आयटीआयचा विद्यार्थी जखमी झाला. शहरातील जैनाबाद परिसरातही एस.टी.बसवर दगडफेक करण्यात आली.
जामनेर, भसावळ व पारोळा येथे रास्ता रोको
जामनेर, भुसावळ व पारोळा येथे एस.टी.बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन केले. या तिन्ही ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जळगाव शहरातून बसेसच्या फेºया थांबविण्यात आल्या होत्या. चाळीसगाव येथे दगडफेक करणारे तरुण पसार झाले आहेत तर जळगाव शहरातील तरुणांच्या शोधासाठी पथक रवाना झाली आहेत. या हल्लेखोरांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जीवंत ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी मालमत्तेचे नुकसान तसेच कामात अडथळा आणल्याचा १०ते१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरहून पोलीस,अधिकारी माघारी बोलविले
दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात तणावाची स्थिती असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. अहमदनगर येथे पाठविण्यात आलेले १६९ कर्मचारी, १४ उपनिरीक्षक,दोन निरीक्षक यांना माघारी बोलावण्यात आले आहे तर अमरावती येथून राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय नियंत्रण कक्ष व गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचाºयांनाही राखीव ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अफवा तसेच सोशल मीडियावरील पोस्टवर विश्वास ठेऊ नये. कोणीतीही माहिती मिळाली तर पोलिसांशी संपर्क साधावा. अफवा पसरविणाºयांविरुध्द गुन्हे दाखल केले जातील.
-दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक