जळगावातील तरुणीला दहशतवादी बनविण्याचा प्रयत्न - आईची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:53 AM2018-03-04T11:53:49+5:302018-03-04T11:53:49+5:30
८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ४ - प्रेम प्रकरणातून पळवून नेलेल्या मुलीला जबरदस्तीने दहशतवादी करण्याचा प्रयत्न केला गेला, तिने नकार दिला असता तिचा खून करुन मृत शरीराची विल्हेवाट लावल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार ८ जणांविरुध्द खून, खोटे दस्ताऐवज व कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीला पळवून नेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी पीडित मुलीच्या आईने न्यायालयात धाव घेऊन घटनाक्रम कथन केला. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणात १५६/३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश रामानंद नगर पोलिसांना दिले आहेत.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार,शेख वसीम शेख अहमद (रा.दंगलग्रस्त कॉलनी, जळगाव) याने ७ जून २०१७ रोजी शहरातील एका २१ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. त्यानंतर शेख अहमद शेख गुलाब , शकीराबी शेख अहमद , शेख इम्रान शेख अहमद , शेख अब्दुल शेख अजीज, सईद अब्दुल अजीज शेख व सोहेल खान अब्दुल खान अय्युब खान यांनी कट रचून मुलीला पळवून लावले तर शेख वसीम याने तिच्याशी लग्न करुन दहशतवादी कार्यात सहभागी करण्याचा प्रयत्न केला. तिने या कृत्यास नकार दिल्याने त्यांनी तिचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली.
काझी मोहम्मद इस्लमा (रा.बांद्रा, मुंबई) याने धर्मांतर केल्याबाबतचे खोटे दस्ताऐवज केले. २७ आॅगस्ट २०१७ नंतर हे सर्व कारस्थान झाले आहे. त्यानुसार या आठ जणांविरुध्द कलम ३०२, २०१ व १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम करीत आहेत.