जळगावात चेहऱ्यावर स्प्रे मारून पैशांची बॅग लांबविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:20 PM2018-08-18T12:20:11+5:302018-08-18T12:21:02+5:30
गणेश कॉलनी परिसरातील घटना
जळगाव : शहरातील गणेश कॉलनी परिसरात असलेल्या शुभकामना संकुलाजवळील रस्त्यावर गोविंद राठी (वय-४५, रा़ गणेश कॉलनी) या व्यापाºयाच्या चेहºयावर केमिकलचा स्प्रे मारून त्यांच्या हातातील पैशांची बॅग चोरट्यांनी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे़ दरम्यान, राठी यांनी आरडाओरड केल्याने मोटारसायकलवर आलेले चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले. ही घटना १६ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली.
या घटेबाबत मिळालेली माहिती अशी की, गणेश कॉलनी परिसरातील शुभकामना संकुलाच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेले व्यापारी गोविंद राठी यांचे दाणाबाजारात दुकान आहे़ १६ आॅगस्ट रोजी नेहमी प्रमाणे राठी यांनी दाणा बाजारातील दुकान बंद करून त्यांच्या मोटारसायकलीने घरी येण्यासाठी निघाले. घरापासून काही अंतरावर मागून मोटारसायकलवर दोन तरूण त्यांचा पाठलाग करीत होते़ रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ते शुभकामना संकुलाजवळून जात असताना दोघा तरुणांनी त्यांच्या तोंडावर केमिकलचा स्प्रे मारून त्यांच्या हातातील पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. राठी यांनी चोरट्यांचा जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केली व घराच्या प्रवेशद्वारात धाव घेतली. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला़
बॅगेत हजारोंची रोकड
राठी यांच्या बॅगेत दुकानाची रोकड असल्याने मोटारसायकलवर आलेले चोरटे दाणाबाजारापासून त्यांच्या मागावर असल्याचे राठी यांनी जिल्हापेठ पोलिसांना सांगितले. राठी यांचा पाठलाग करून त्यांच्या घराजवळील शांततेच्या ठिकाणी त्याच्या चेहºयावर स्प्रे मारून लुटण्याचा प्रयत्न केला़
दरम्यान, चोरट्यांनी राठी यांच्या तोंडावर मारलेला स्प्रे हा शेतामध्ये औषध वापरल्या जाणाºया उग्र वास येणाºया स्प्रे असल्याचे राठी यांनी सांगितले़ स्प्रे मारल्याने राठी यांच्या चेहरा व डोळ्यात जळजळ झाली. तसेच राठी यांना लेगच गुंगी येत असल्याने राठी यांनी आरडाओरड करून जवळच असलेल्या त्यांच्या घरात धाव घेतल्यामुळे बॅग चोरी होण्यापासून वाचल्याचे पोलिसांना सांगितले़
स्प्रे मारल्याने चेहरा सुजला
स्प्रे मारल्याने राठी यांचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे. यापूर्वी लुटण्यासाठी मिचीर्पूड, गुंगीचे औषध टाकून लुटण्याच्या घटना समोर आल्या होत्या. उग्र वासाचा स्प्रे चेहºयावर मारून लुटण्याचा प्रयत्न आता केला. या घटनेमुळे स्प्रे मारून लुटण्याची पहिलीच घटना असल्याचे पोलिसांकडून समजते. याबाबत पोलिसांकडून घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे़ दरम्यान, याबाबत उशीरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नाही़