जळगावात निलंबित पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 04:27 PM2018-09-21T16:27:32+5:302018-09-21T16:29:46+5:30
बनावट नोटा छापल्याच्या प्रकरणात सोलापुर जिल्ह्यातील टेंभूर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबित केलेल्या रविकांत वसंत पाटील (४८, रा. निमखेडी, ता.जळगाव, मुळ रा.वरणगाव) या पोलिसाने निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराच्या आवारात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जळगाव : बनावट नोटा छापल्याच्या प्रकरणात सोलापुर जिल्ह्यातील टेंभूर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबित केलेल्या रविकांत वसंत पाटील (४८, रा. निमखेडी, ता.जळगाव, मुळ रा.वरणगाव) या पोलिसाने निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराच्या आवारात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविकांतविरुध्द तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील याच्याविरुध्द सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी पोलीस स्टेशनला दीड ते दोन वर्षापूर्वी बनावट नोटा छापल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेथून सुटका झाल्यानंतर त्याला पक्षघाताचा आजार जडला. त्याला निलंबित करण्यात आले होते. निलंबन काळात त्याला चाळीसगाव मुख्यालय देण्यात आले होते. आजारपणामुळे चाळीसगावला जाणे शक्य होत नसल्याने नैराश्यात त्याने ५ रोजी कृषी केंद्रातून शेतकरी सांगून पिकांवर फवारणी करण्याचे औषध घेतले होते.
निमखेडी शिवारात शिवधाम मंदिरात रात्री आठ वाजता विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रविकांत याला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथून उपचार घेतल्यानंतर त्याची सुटका झाली आहे.