भुसावळात एटीएम फोडून रक्कम लांबविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:40 AM2018-12-16T00:40:48+5:302018-12-16T00:42:44+5:30

भुसावळ , जि.जळगाव : शहरातील जामनेर रोडवरील नवशक्ती कॉम्प्लेक्समधील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला. ही घटना ...

The attempt of thieves to break the ATM in Bhusaval is ineffective | भुसावळात एटीएम फोडून रक्कम लांबविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

भुसावळात एटीएम फोडून रक्कम लांबविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

Next
ठळक मुद्देचोरटे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैदचोरट्यांनी चेहºयाला गुंडाळले होते कापड

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील जामनेर रोडवरील नवशक्ती कॉम्प्लेक्समधील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला. ही घटना शनिवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली.
घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधिकाठयांनी धाव घेतली. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात इंडीयन ओव्हरसीस बँकेचे शाखाधिकारी आशिषकुमार सोनडीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात ठिकठिकाणी घरफोडीचे सत्र सुरू आहे. यातच आता चोरट्यांनी एटीएम मशीनकडे लक्ष वळविल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

शहरातील जामनेर रोडवरील मोटूमल सोबराज चौकाजवळ इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरटङांनी १५ रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान फोडण्याचा प्रयत्न केला. सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास नवशक्ती कॉम्प्लेक्समधील दुकानदार नितीन वायकोळे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी संबंधितांना याबाबत कळविले. अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनचे मेन गेटचे लॉक तोडून आत प्रवेश केला. मात्र, चोरट्यांकडून एटीएम मशीन न तुटल्याने त्यांनी पोबारा केला. एटीएम मशीनमध्ये अंदाजे ८ लाख रुपयांची रक्कम होती. १४ रोजी दुपारी १ वाजता उपशाखा अधिकारी यांनी एटीएम मशीन चेक केले होते. १३ रोजी त्यांनी एटीएममध्ये रक्कम नसल्यामुळे ८ लाख ७३ हजार ३०० रुपयांचा भरणा केला होता. दोन दिवसात ग्राहकांनी १८ हजार ८०० रुपये काढले. उर्वरीत रक्कम चोरण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. एटीएम मशीनवर सिक्युरीटी गार्ड वगैरे नेमलेला नव्हता, मात्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. एटीएम टेक्निशियन गौरव शिंदे यांनी घटनास्थळी येवून एटीएम मशीनची पाहणी केली. एटीएम ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला कपडा गुंडाळलेल्या चोरट्यांची छायाचित्रे कैद झालेली आहेत. बाजारपेठ पोलीसांच्या डिबी पथकातील अंबादास पाथरवट, निलेश बाविस्कर, सुनिल थोरात, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहूल चौधरी, दीपक जाधव, योगेश माळी, सचिन चौधरी, संदीप परदेशी, कृष्णा देशमुख यांनी धाव घेतली. चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. डिवायएसपी गजानन राठोड, पीएसआय अनिस शेख यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असून तपासाबाबत कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत इंडीयन ओव्हरसीस बँकेचे शाखा अधिकारी आशिषकुमार अनंतलाल सोनडिया (वय ३७) रा. बद्री प्लॉट यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय अनिस शेख हे करीत आहेत.
दरम्यान, शहरात चोरट्यांकडून घरफोड्यांचे सत्र सुरू असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. आता चोरट्यांनी शहरातील एटीएम मशीन फोडून चोरी करण्याकडे लक्ष केंद्रीत केले असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांधून जोर धरीत आहे.

Web Title: The attempt of thieves to break the ATM in Bhusaval is ineffective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.