चोपड्यात गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 11:11 PM2020-10-30T23:11:04+5:302020-10-30T23:14:34+5:30

तापी सूतगिरणी आवारात घटस्थापनेच्या मध्यरात्री गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न प्रसंगावधानामुळे फसला. पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर यांनी चोपडा पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Attempted manslaughter for hidden treasure in the book | चोपड्यात गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न

चोपड्यात गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देसूतगिरणीच्या आवारातील घटना पोलिसात तक्रार दिल्याने उघडकीस आला प्रकार

चोपडा, जि.जळगाव : तापी सूतगिरणी आवारात घटस्थापनेच्या मध्यरात्री गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न प्रसंगावधानामुळे फसला. पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर यांनी चोपडा पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सूत्रांनुसार, वडगावसीम, ता.चोपडा येथील रहिवासी व पंचायत समिती सदस्य तथा भरत विठ्ठल बाविस्कर व चौगाव येथील सुकालाल कोळी हे दोघे जण कामानिमित्ताने १७ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे गेले होते. काम आटोपून रात्री उशिरा चोपडा येत असताना सूतगिरणीच्या मुख्य गेटजवळून जात असताना मला वाचवा, मला वाचवा असा मोठा आवाज देत एक व्यक्ती पळताना व त्याच्या मागे ५ ते ६ जण त्याला पकडण्यासाठी धावताना दिसले.
याबाबत पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मध्य रात्री प्रथमदर्शनी चोरीचा प्रकार असावा म्हणून ती चार पाच व्यक्ती त्या चोराला पकडण्यासाठी पळत असावी, असे बाविस्कर व कोळी यांना वाटले. म्हणून खरी हकीकत जाणून घेण्यासाठी दोघेही गेटजवळ गेले. तेवढ्यात तो पळणारा अनोळखी व्यक्ती कंपाऊंडवरून उडी घेऊन बाहेर पडला. त्याला पकडण्यासाठी धावणाऱ्या त्या ५ ते ६ जणांनी गेट उघडून त्याच्या मागे धाव घेतली. हा प्रकार नेमका काय आहे. म्हणून जाणून घेण्यासाठी बाविस्कर व कोळी यांनी गेटवर जमलेल्या कर्मचाऱ्यांना विचारले असता नरबळी देण्याचा भयानक प्रकार ऐकण्यास मिळाला.
बाहेरील तालुक्यातील एका आदिवासी व्यक्तीचा गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा घाट सूतगिरणीचे कर्मचारी प्रफुल पवार, गोरगावले येथील मनोहर पाटील, घुमावल येथील दीपक पाटील व त्यांचे सहकारी यांचा होता. पूजा व साहित्याची मांडणी करून तापीच्या पाण्याने त्याची आंघोळ करून सूतगिरणीच्या दुसऱ्या टप्प्यातील सुरू असलेल्या बांधकामाकडे घेऊन गेले. त्या ठिकाणीं निंबू, अंडी, अगरबत्ती, मिरची, गुलाल, भिलावे, नवी चादर, सुई असे साहित्य पाहिल्यावर सदर व्यक्तीच्या लक्षात आले की ठिकाणीं आपला बळी देवून धन काढण्याचा ह्या लोकांचा प्रयत्न दिसतो म्हणून त्याने प्रसंगावधान राखून प्रफुल्ल पवार नामक व्यक्तीच्या हाताला चावा घेऊन धूम ठोकली. त्याच्या सतर्क राहण्याने पुढील अनर्थ टळला, अशी माहिती तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी भित-भित दिली. त्यामुळे बळी गेला नाही किंवा गुप्तधन निघाले नाही. परंतु गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळ सूतगिरणी असल्यामुळे यात शासनाचीही फसवणूक झाल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांचीही भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला आहे.

चौकशी सुरू आहे- पोलीस निरीक्षक संजय ठेंगे
या प्रकाराबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर व सुकलाल कोळी यांनी तक्रार अर्ज दिला आहे का, अशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, २८ रोजी तक्रार अर्ज आलेला आहे. त्यास अनुसरून खरोखर असा प्रकार घडलेला आहे किंवा नाही याबाबत चौकशी सुरू असल्याचे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.


असा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही- चेअरमन कैलास पाटील
या घटनेबाबत संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार सूतगिरणीच्या परिसरात खपवून घेतला जाणार नाही. मलाच असा प्रकार अजिबात सहन होत नाही. केवळ बदनामीसाठी आणि अवैध मार्गाने वाळू वाहतूक केल्याप्रकरणी तक्रार केल्यामुळेच हे प्रकार होत असल्याचे तापी सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

Web Title: Attempted manslaughter for hidden treasure in the book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.